३ दिवस जमीन खोदून एका व्यक्तीने शोधली दुसऱ्या जगाची वाट

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एका छोट्या डोंगराखाली एक मोठा खड्डा दिसत आहे. 3 दिवस जमिनीवर खोदणारा मॅट इरी तिथे उभा असून त्याचा भाऊ जेम्स आणि एडवर्डही तिथे उपस्थित होता.

    जगभरामध्ये अशा अनेक रहस्यमय जागा आहेत. ज्या जागांबद्दल अजून कोणालाही माहित नसेल. त्यामुळे अशा अनेक नवीन ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. काही ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांना हजारो वर्षे पूर्वीच्या जुन्या लोकांचे आणि शहरांचे पुरावे सापडले आहेत. तर काही ठिकाणांमध्ये खजिना सापडला आहे. यामध्ये अनेक वस्तू, सोनं- चांदी, भांडी यांसारख्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

    लोक लहान मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने खजिना शोधून काढल्याचा दावा केला आहे. एका व्यक्तीला त्याच्या घराच्या मागे संपूर्ण गुहा सापडली. ही गुहा तीन दिवस खोदल्यानंतर त्याला गुहेचे प्रवेशद्वार दिसले आणि तो आश्चर्यचकित झाला. गुहेच्या आतमध्ये पाहिल्यानंतर त्याला एका वेगळ्या जगाची वाट दिसू लागली.

    सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एका छोट्या डोंगराखाली एक मोठा खड्डा दिसत आहे. 3 दिवस जमिनीवर खोदणारा मॅट इरी तिथे उभा असून त्याचा भाऊ जेम्स आणि एडवर्डही तिथे उपस्थित होता. या छोट्याशा वाटेने तिघेही आतमध्ये जातात. तिथे असलेला नजारा पाहून तुमचे देखील डोळे भारावून गेले असतील. त्यांनी जणू काही वेगळ्या जगामध्ये प्रवेश केला आहे असे त्यांना वाटू लागले. खडकाळ वाटेवरून जाताना अनेक आश्चर्यकारक दृश्येही त्यांना पाहायला मिळाली. एका ठिकाणी तर त्याला एखादा मोठा पक्षी किंवा अजगर बसल्यासारखे वाटले.

    एवढंच नसून तिथे जाण्यासाठी अनेक अरुंद वाटा आहेत. त्यानंतर ते तिघसुद्धा त्या मार्गाने पुढे पुढे जातात. जसजसे आपण पुढे जात आहोत तसतसे नवीन गोष्टी दृश्यमान होत आहेत. काही ठिकाणी उंच ढिगारा तर काही ठिकाणी जमिनीखालून पाणी वाहत असल्याचे दिसून येते. गुहेच्या आत एक छोटी नदी वाहते असे त्यांना वाटतं आहे. या गुहेच्या पलीकडे त्यांना अनेक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला अनेक कमेंट्स देखील आल्या आहेत. तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला आहे. उत्खनन केल्यानंतर जगभरात अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत.