विमानात निवांत झोपण्यासाठी अनोखी शक्कल; महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर विमानामधील आणि विमानतळावरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    सुलभ प्रवासासाठी विमान प्रवासाची निवड केली जाते. अनेकांना विमानाने प्रवास करणे आवडते. यामुळे वेळ देखील वाचतो. आणि प्रवास देखील सुखकर होतो. सोशल मीडियावर विमानामधील आणि विमानतळावरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने झोपण्यासाठी अनोखी शक्कल वापरली आहे. याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    लांबच्या प्रवासासाठी विमान प्रवास निवडला जातो. रेल्वे पेक्षा विमान सेवेची अनेकांची पसंती असते. मात्र आता विमानामध्ये देखील काही अतरंगी माणसं येत असतात. सोशल मीडियावर अशाच एका अतरंगी महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. 5 मिलियन्सहून अधिक लोकांनी या फोटोला पाहिले आहे. यामध्ये एक महिला चक्क सामान ठेवण्याच्या जागी झोपली आहे. विमानात प्रवाशांना बसण्यासाठी सीट असते. आणि ओव्हरहेड कपाटात सामान ठेवण्यासाठी जागा असते. मात्र महिला चक्क यामध्ये झोपली आहे.

    प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी असलेले जागेमध्ये ही महिला झोपली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना साउथवेस्ट एअरलाइन्समध्ये घडली आहे. एअरलाइन्सच्या एका फ्लाइटमध्ये महिला सामान ठेवायच्या ठिकाणी झोपली होती. महिलेची ही कृती पाहून इतर प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी मजेशीर कमेंट्सदेखील केल्या आहेत. यात आमच्या बेंगाच नीट बसत नाही, तिथे या आजीबाई कशा झोपल्या’. ‘एअरलाइन्समध्येही आता झोपण्यासाठी काहीही करायला लागलेत, अशा कमेंट्स आल्या आहेत.