धक्कादायक! खाकीला काळीमा फासणारी घटना, वाहतूक पोलिसाने पैसे उकळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कल्याणच्या कोळसेवाडी वाहतूक पोलीस चौकीचे निरीक्षक नवनाथ मिरवणे (Inspector Navnath Mirwane of Kalyan Kolsevadi traffic police Chowki) असे या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असून कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात एका रिक्षा चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले.

    कल्याण : वाहतूक पोलिसांचा (Traffic Police) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video) समोर आला आहे. इथे एक वाहतूक पोलीस अधिकारी चक्क एका रिक्षा चालकाकडे (Auto Driver) पैशाची मागणी (Extorting Money) करताना दिसत आहे. सदर व्हिडिओ हा कल्याणमधील (Viral Video In Kalyan) असल्याचे बोलले जात आहे.

    कल्याणच्या कोळसेवाडी वाहतूक पोलीस चौकीचे निरीक्षक नवनाथ मिरवणे (Inspector Navnath Mirwane of Kalyan Kolsevadi traffic police Chowki) असे या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असून कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात एका रिक्षा चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर त्याच्याकडून रीतसर कायदेशीर पावती फाडण्याऐवजी मिरवणे हे रिक्षा चालकाकडे पैशाची मागणी करताना दिसून येत आहे.

    हा रिक्षा चालक शंभर रुपये देत असताना आणखी शंभर रुपये वाढवून देण्याची मागणी वाहतूक पोलीस मिरवणे करत होते. मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता या प्रकरणी वाहतूक पोलिसावर काय कारवाई केली जाते का हे पाहावे लागेल.