
कडवासरामध्ये राहणाऱ्या प्रसूता देवीला लेबर पेन सुरु झाले. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांना सोनोग्राफी रिपोर्ट पाहून लगेच डिलिव्हरी करावी लागली. नॉर्मल डिलिव्हरीनंतर जेव्हा बाळाचं वजन तपासण्यात आलं तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले.
जोधपूर : राजस्थानातील Rajasthan) जोधपूर (Jodhpur News) जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. ज्याची चर्चा सध्या संपूर्ण राजस्थानमध्ये सुरु आहे. इथे काल एका मुलाचा जन्म झाला आहे. मात्र या मुलाच्या जन्मानंतर डॉक्टरांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण जन्मत:च मुलाचं वजन 6 किलो (Baby With 6 Kg Weight) आहे. बाळ आणि बाळाची आई दोघांचीही तब्येत उत्तम आहे. मात्र खबरदारी म्हणून दोघांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे. बाळाची इतकी वाढ कशी झाली हे डॉक्टर तपासत आहेत. नेमकं इतकं वजन असण्याचं कारण शोधण्यात ते मग्न आहेत.
कडवासरामध्ये राहणाऱ्या प्रसूता देवीला लेबर पेन सुरु झाले. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांना सोनोग्राफी रिपोर्ट पाहून लगेच डिलिव्हरी करावी लागली. नॉर्मल डिलिव्हरीनंतर जेव्हा बाळाचं वजन तपासण्यात आलं तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण त्याचं वजन 5 किलो 925 ग्रॅम होतं.
जन्मल्यानंतर काही वेळ बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता. मात्र डॉक्टरांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि बाळाची प्रकृती ठिक झाली. ही डिलिव्हरी करणारे डॉक्टर सज्जन बेनीवाल सांगतात की, ते 12 वर्षांपासून नोकरी करत आहेत. मात्र असं कधीच झालं नाही की जन्मत:च एखाद्या मुलाचं वजन जास्त होतं.
डॉक्टरांच्या मते, बाळाचं वजन जन्मल्यानंतर साधारण 3 ते 3.5 किलोच्या दरम्यान असतं. मात्र आईच्या शरीरातील साखर वाढली तर बाळाच्या शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे बाळाचं वजन वाढतं. डिलिव्हरीच्या वेळी आई आणि मूल दोघांच्याही जीवाला धोका असतो. याआधी ब्रिटनमध्ये 6.2 किलो वजनाच्या बाळाचा जन्म झाला होता. तसेच कॅनडामध्ये 1879 ला अशाच एका बाळाचा जन्म झाला होता ज्याचं वजन 10.8 किलो होतं. जन्मानंतर काही वेळातच या बाळाचा मृत्यू झाला. खूप कमी वेळा असे चमत्कार बघायला मिळतात जेव्हा मुलाचं वजन जन्मत:च जास्त असतं. राजस्थानमधल्या घटनेने सध्या सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. हे बाळ सध्या कौतुकाचा विषय ठरले आहे. लोक या बाळाला भीमाची उपमा देत आहेत.