बाबो, घटस्फोटाचा किती तो आनंद! नटून थटून खास पोज देत महिलेनं केलं फोटोशूट, आता होतोय वाद

पतीपासून विभक्त झाल्यानंतर एका महिलेने घटस्फोटाचे फोटोशूट केले आहे. हे अपयश नसून आयुष्यातील टर्निंग पॉइंट असल्याचा संदेश तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.

    आजकाल लोकांना खासगी आयुष्यातील प्रत्येक क्षणाची अपडेट सोशल मिडियावरुन द्यायला आवडंत. लग्न जुळण्यापासुन ते प्रिवेंडीग त्यांनतर लग्न सोहळ्याचे फोटे शेयर करत असतात. मात्र, कुणी घटस्फोट घेतल्यानंतर त्याच्यासाठी खास फोटोशूट केल्याचं कधी ऐकलं आहे का?  सध्या सोशल मीडियावर एका मुलीचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये महिला घटस्फोटानंतर आनंद व्यक्त करत फोटोशूट करताना दिसत आहे. हे फोटोशूट आता चांगलच व्हायरल झालं असुन त्यांची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोक याला विरोध करत आहेत तर अनेक जण समर्थनही करत आहेत.

    ही महिला कोण आहे

    मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलेने फोटोशूट केले आहे तिचे नाव शालिनी आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस घालून घटस्फोट साजरा केला आहे. तिने स्वतःचा आणि पुर्वीच्या पतीचा फोटो फाडुन फोटो काढला आहे. याशिवाय लग्नाचे चित्र पायाखाली चिरडून संताप व्यक्त केला. महिलेने हातात ‘DIVORCE’ लिहिलेली रिबन घेऊन छायाचित्रांसाठी पोझही दिली. दुसऱ्या फोटोत शालिनी एका हातात दारूची बाटली आणि दुसऱ्या हातात बोर्ड घेऊन उभी आहे. या फोटोवरुन आता नवा वाद सुरू झाला आहे.  सोशल मीडियावर अनेकांचे म्हणणे आहे की शालिनीने हे काम केले आहे जेणेकरून तिने रूढीवादी कल्पना मोडून काढता याव्यात आणि पतीपासून विभक्त झाल्यानंतरही ती सामान्य जीवन जगू शकेल असा संदेश देऊ शकेल.

    शालिनीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘घटस्फोटित महिलेचा संदेश ज्या महिलांना शांत वाटत आहे. तुम्हालाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे जेणेकरून तुम्ही वाईट विवाहाच्या बंधनातून बाहेर येऊ शकता. आयुष्याशी तडजोड करू नका. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. त्यांनी लिहिले, घटस्फोट हे अपयश नसून एक टर्निंग पॉइंट आहे. तर, तिच्या या फोटोशूट वर अनेक प्रतिक्रीय येत असुन वेदनादायक नातेसंबंधातून बाहेर पडणे ही आनंदाची गोष्ट असल्याचं काही जण म्हणत आहेत.