शाळेतच मुख्याध्यापिका अन् शिक्षिका भिडल्या; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुख्यध्यापिका आणि शिक्षिकेमध्ये शाळेमध्येच मारामारी झालेली दिसून येत आहे.

    विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांना शालेय ज्ञान मिळावे या हेतून पालक आपल्या पाल्याला शाळेमध्ये घालत असतात. शाळेतील शिक्षिका त्यांना चांगली शिकवण देतील अशी अपेक्षा पालकांची असते. मात्र शाळेतील शिक्षिकाच जर शाळेमध्ये तुंबळ हाणामारी करायला लागल्या तर मात्र या अपेक्षांवर पाणी फिरले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुख्यध्यापिका आणि शिक्षिकेमध्ये शाळेमध्येच मारामारी झालेली दिसून येत आहे.

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडिओ आग्राची असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये महिला शिक्षिका आणि महिला मुख्याध्यापिका यांच्यामध्ये बाचाबाची झालेली दिसून येत आहे. शाळेत उशीरा येण्यावरुन ही मारामारी झाली आहे. विद्यार्थी समोर असतानाच शाळेमध्ये ही भांडण सुरु झाली. अगदी बाचाबाची आणि मारामारीपर्यंत हे प्रकरण गेले. काही शिक्षकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तुंबळ हाणामारी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

    हे संपूर्ण प्रकरण सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिग्ना पूर्व माध्यमिक शाळेशी संबंधित आहे. महिला शिक्षिका उशिरा आल्यामुळे मुख्याध्यापक संतापले. अन् त्यांनी शिक्षिकेला मारहाण केली आहे. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसमोर शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मारामारी करत असल्यामुळे नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.