amruta fadnavis best wishesh for holi and dhulivandan video viral on social media nrvb

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला असून त्याद्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची मुलगी दिवीजा आणि त्यांचा पाळीव पोपट यांच्यासोबतच्या दोन व्हिडिओ क्लिप शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात होळी (Holi) आणि धुलिवंदनाचा उत्साह (Dhulivandan Celebration) पाहायला मिळत आहे. सर्वजण मोठ्या उत्साहता हा सण साजरा करताना दिसत आहेत. आपल्या विशिष्ट लुकमुळे नेहमी चर्चेत असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी होळीच्या भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला असून त्याद्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची मुलगी दिवीजा आणि त्यांचा पाळीव पोपट यांच्यासोबतच्या दोन व्हिडिओ क्लिप शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी “धरती के सभी प्रणियो को होली की शुभकामनाएँ!” अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे.

पाहा व्हिडिओ :

होळीचा उत्साह राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज मुंबईत होळी साजरी केली. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी होळी आणि धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. नातू रुद्रांशसोबत रंग खेळताना त्यांचा व्हिडीओही समोर आला आहे.