आनंद महिंद्रांनी पुन्हा एकदा जिंकली मने, Jugaad जीप निर्मात्याला दिली SUV भेट

काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर जुगाडमधून 'जीप' बनवणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तीच्या क्षमतेचे कौतुक केले होते. तसेच, त्यांना नवीन बोलेरो देण्याचे वचन दिले. आता तेच आश्वासन पूर्ण करून त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत.

  उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपले वचन पाळत पुन्हा एकदा सर्वसामान्यांची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटरवर ‘देसी जुगाड’ (Desi Jugaad)मधून ‘जीप’ बनवणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तीच्या क्षमतेचे कौतुक केले होते. तसेच, त्याला नवीन बोलेरो (Bolero) देण्याचे वचन दिले.

  महिंद्रा यांनी २५ डिसेंबरला ट्विट करून जगाला सांगितले की, मी नेहमीच दिलेले वचन पाळतो. खरेतर, महिंद्रा यांनी जुगाड बनवलेल्या जीपमधील सुरक्षेचे धोके लक्षात घेऊन त्या व्यक्तीला नवीन Bolero भेट देण्याची घोषणा केली होती.

  आनंद महिंद्रा यांनी दिलेले वचन पाळले

  २५ डिसेंबर रोजी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर दत्तात्रेय यांची काही छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले – ‘आपली कार बदलून नवीन बोलेरो घेण्याची ऑफर त्यांनी स्वीकारली याचा अतिशय आनंद झाला. काल त्यांच्या कुटुंबाला नवीन बोलेरो मिळाली आणि आम्ही त्यांची निर्मिती मोठ्या अभिमानाने हाताळली. त्यांचे वाहन आमच्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीतील (Mahindra Research Valley) सर्व प्रकारच्या कारच्या संग्रहाचा भाग असेल आणि आम्हाला साधनसंपन्न होण्यासाठी प्रेरणा देईल.

  काय आहे संपूर्ण प्रकरण?

  विशेष म्हणजे, आनंद महिंद्रा यांनी २१ डिसेंबरला हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नक्कीच हे वाहन कोणत्याही नियमाचे पालन करत नाही. पण मी आमच्या लोकांच्या साधेपणाचे आणि ‘किमान’ क्षमतेने चमत्कार करण्याच्या कलेचे कौतुक करणे कधीही थांबवणार नाही. ही त्याची त्याच्या प्रवासाची आवड आहे. बरं जीपची पुढची लोखंडी जाळी ओळखीची दिसते, नाही का? यानंतर २२ डिसेंबरला आणखी एक ट्विट करण्यात आले आणि जुगाड बनवलेल्या जीपमधील सुरक्षेचे धोके लक्षात घेऊन त्या व्यक्तीला नवीन बोलेरो भेट देण्याची घोषणा करण्यात आली.

  मुलांच्या आग्रहाखातर तयार केली होती जीप

  यूट्यूब चॅनल Historicano च्या मते, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली क्लिप महाराष्ट्रातल्या दत्तात्रेय लोहारची होती, ज्यांनी आपल्या मुलांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी जुगाड ही महिंद्रा थारसारखी (Mahindra Thar) चार चाकी कार बनवली, जी सुरू झाली. ती बाईकच्या इंजिनपासून बनवल्याचे सांगण्यात आले. तर टायर ऑटो रिक्षाचे आहेत.

  एकच मन आहे, किती वेळा जिंकणार?

  महिंद्रा यांचे हे ट्विट आठवतंय का?

  सोशल मीडियावर हे प्रकरण गाजत आहे

  महिंद्रा यांच्या ट्विटला २९.५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो युजर्सनी महिंद्रा यांच्या उदारतेची प्रशंसा केली आणि हो, काही जण म्हणाले की, सर आम्हालाही एक कार गिफ्ट करा ना? त्याच वेळी, अनेक युजर्सनी महिंद्रा यांच्यासाठी सांगितले की ते डाऊन टू अर्थ व्यक्ती आहेत.