आनंद महिंद्रांनी शेअर केला असा व्हिडिओ, लोकं पंतप्रधानांचे कौतुक करायला लागले

हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी ६ नोव्हेंबरला ट्विट केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुम्हाला भारतात डिजिटल पेमेंटचा वाढता वेग पाहून आणखी कोणत्या पुराव्याची आवश्यकता आहे का?'

  …तर डिजिटल असता भारत

  ‘महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुप’ चे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियाच्या जगात आपल्या उत्तम Tweets मुळे चर्चेत असतात. कधी ते फनी, तर कधी देशी जुगाडचे कमाल व्हिडिओ शेअर करत असतात. तथापि, शनिवारी त्यांनी एक अशी क्लिप शेअर केली, जी पाहिल्यानंतर लोकं पंतप्रधान मोदींचे कौतुक करू लागले आहेत. वास्तविक, हा व्हिडिओ भारतात डिजिटल पेमेंटची वाढती लोकप्रियता दर्शविणारा आहे.

  कधी असं पाहिलं होतं का?

  हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी ६ नोव्हेंबरला ट्विट केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘तुम्हाला भारतात डिजिटल पेमेंटचा वाढता वेग पाहून आणखी कोणत्या पुराव्याची आवश्यकता आहे का?’

  या व्हिडिओत आहे काय?

  ३० सेकंदाच्या क्लिपमध्ये, एक माणूस दान देण्यासाठी त्याच्या स्मार्टफोनने ‘नंदी बैला’च्या कपाळावरचा UPI बारकोड स्कॅन करताना दिसतो आहे. हे पाहून लोक हैराण झाले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे एक काळ असा होता की लोक डिजिटल पेमेंट करायला घाबरत होते. पण आता डिजिटल पेमेंट करणे हा लोकांसाठी डाव्या हाताचा खेळ झाला आहे!

  वाह मोदी जी वाह!

  मोदी जी है तो मुमकिन है

  अतुल्य भारत, नया भारत…

  आणखी डिजिटलायझेशन होऊ शकत नाही

  जुगाडू भारतीय…

  मोदीजींची कमाल

  संपूर्ण श्रेय मोदीजींनाच

  या व्हिडिओला बातमी लिहिपर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २४.४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोबतच शेकडो युजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. डिजिटल इंडियाचा हा व्हिडिओ पाहून लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूपच कौतुक करत आहेत. याविषयी तुमचं मत काय?