‘या’ मुलीने आपले कपडे भाड्याने द्यायला केली सुरुवात; आज उभा केलाय कोट्यावधींचा बिझनेस

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये (Australia, Melbourne)  राहणाऱ्या एका महिलेला कपड्यांबाबत (Cloths) नवीन कल्पना (New Idea) सुचली. खरे तर तिने तिचे कपडे लोकांना भाड्याने (She Gives Her Cloths On Rent) द्यायला सुरुवात केली.

  आजकाल आयडिया विकल्या जातात (Sell The Ideas), होय… तुमच्याकडे कोणती नवीन कल्पना आहे, ही आजच्या तारखेत सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या कपाटात किती कपडे (Cloths In Cupboard) पडलेले आहेत? तरीही बाजारात गेल्यावर नवीन खरेदी करण्याकडे (Purchase New Cloths) कल कमी होत नाही. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहणाऱ्या एका महिलेला कपड्यांबाबत नवीन कल्पना सुचली. खरे तर तिने तिचे कपडे लोकांना भाड्याने द्यायला सुरुवात केली. यातून ती आज करोडो रुपये कमावते आहे.

  तरुण वयातच हा व्यवसाय केला सुरू

  ब्रिटनी मॅकक्वेड (Brittany McQuade) असे या महिलेचे नाव असून तिने वयाच्या २० व्या वर्षी हे काम करायला सुरुवात केली होती. हळूहळू तिचे काम लोकांना आवडू लागले. तिच्या कपड्यांचे डिझाईन्सही खूप वेगळे आहेत.

  या पैशातून विकत घेतले आलिशान घर

  कपडे भाड्याने देऊन तिने आज एक आलिशान घर घेतले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अनोख्या व्यवसायातून कमावलेल्या पैशातून तिने स्वत:साठी एक आलिशान घरही घेतले आहे. तिच्या या घराची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. या कामातून तिने ७० लाखांहून अधिक रुपयांची कमाई झाली आहे.

  महिलांना सोबत घेऊन केले प्रयोग

  ती म्हणते, ‘जेव्हा माझ्या लक्षात आले की स्त्रिया अनेकदा पार्टीमध्ये परिधान केल्यावर पुन्हा कपडे घालू इच्छित नाहीत. दुसरीकडे, प्रत्येक वेळी नवीन कपडे खरेदी करणे खूप महाग झालं आहे. हे लक्षात घेऊन तिने आपले कपडे सेकंडहँड सेलिंग साइटवर भाड्याने देण्यास सुरुवात केली.

  महागडे कपडे घातले नाहीत

  ब्रिटनीचे म्हणणे आहे की, तिच्याकडे यापूर्वी खूप महागडे आणि सुंदर कपडे होते. तिने ते परिधानही केले नाही. मग तिने या कपड्यांमधून पैसे कमविण्याचा विचार सुरू केला. तिला विक्रीच्या ठिकाणी कपड्यांचे चांगले दरही मिळू लागले.

  तिच्याकडे आहेत ३०० हून अधिक कपडे

  प्रथम तिने २५ कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. हे कपडे तिने एक-दोन वेळा घातल्यानंतर ठेवले होते. हळूहळू धंदा वाढत गेला, म्हणून तिने जास्त कपडे विकत घेऊन भाड्याने द्यायला सुरुवात केली. आता तिच्याकडे असे ३०० हून अधिक कपडे आहेत, जे ती भाड्याने देते. यातून ती लाखो रुपये कमावते.

  मित्रांसोबत फोटोही करते शेअर

  ब्रिटनीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबतच ती फॅशनबाबत लोकांकडून सूचनाही घेते. इन्स्टावर तिचे १९ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.