Representational image - social media
Representational image - social media

दारुच्या नशेत माणूस अनेकदा सत्य बोलतो आणि या सत्यामुळे कधी नाती तुटतात तर कधी नोकऱ्या. पण मद्यधुंद अवस्थेत एक माणूस आपल्या बॉसला जे काही बोलला त्याचा राग येण्याऐवजी तो आनंदी होताना दिसत आहे.

    लोकं दारु पिल्यावर काय करतील याचा काही नेम नाही. असं म्हणतात की दारु पिल्यावार माणूस खरं बोलतो. मात्र, अशावेळी तो नेमकं काय करतोय त्याला भान राहत नाही त्यामुळे अशाप्रकारे दारुच्या नशेत बोलण्याचे नंतर काय काय परिणाम भोगावं लागणार हे त्याला माहित नसतं. असाचा काहीसा प्रकार घडला आहे. त्याचाी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. एका व्यक्तीने आपल्या दारुच्या नशेत बॉसला असा संदेश पाठवला की त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यात काय लिहिले आहे ते वाचून कोणताही बॉस खूश होईल. (Employee late-night drunk text) जेव्हा त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला तेव्हा लोकांनी त्यावर खूप कमेंट करायला सुरुवात केली.

    ‘बॉस मी नशेत आहे पण मी…’

    बॉसने स्वतः त्याच्या ज्युनियरच्या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. मेसेजमध्ये मद्यधुंद कर्मचाऱ्याने आपल्या बॉसबद्दल आपुलकी व्यक्त केली.

    मध्यरात्री 2.30 वाजता केलेल्या मेसेजमध्ये त्याने लिहिले- ‘बॉस, मी नशेत आहे पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. मला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. चांगली कंपनी शोधण्यापेक्षा चांगला व्यवस्थापक शोधणे कठीण आहे. त्यामुळे मी भाग्यवान आहे. स्वतःचे कौतुक करा आणि स्वतःचे अभिनंदन करा. बाय.’

    नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स

    पोस्टच्या कॅप्शनमध्ये बॉसने (सिद्धांत) लिहिले – X कडून नशेत मेसेज येणे सामान्य आहे, पण तुम्हाला असा मेसेज कधी आला आहे का? ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर भरपूर कमेंट करायला सुरुवात केली. कोणीतरी म्हणाले – तू खूप भाग्यवान आहेस की तुझे ज्युनियर तुला आवडतात. त्याच वेळी, आणखी कोणीतरी लिहिले – आपण खरोखर चांगले व्यवस्थापक असणे आवश्यक आहे, अन्यथा कोणीही असा संदेश पाठविला नसता.

    दुसऱ्या युजरने लिहिले – हा मेसेज तुमच्या सीव्हीमध्ये जोडा, त्याचा परिणाम होईल. एका दिवसात या पोस्टला 3500 हून अधिक लोकांनी लाईक केले आणि 100 हून अधिक रिट्विट्स केले.