DMRC चे प्रयत्न गेले वाया! इतकं करुनही पुन्हा दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल, यावेळी दोन मुलं…

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा हातात गुलाब घेऊन मेट्रोमध्ये येतो आणि गुडघ्यावर बसतो आणि मुलाला प्रपोज करतो.

    दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल  (Viral Video) होणं थांबत नाही आहे. मेट्रोमध्ये अश्लील प्रकार करण्यांना आळा घालण्यासाठी DMRC कडून पेट्रोलींग पथक तैनात करण्यात येणार आहे. तरीही याचा काहीही परिणाम लोकांवर झालेला दिसत नाही आहे. दोन-तीन दिवसापुर्वी किस करणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा एका कपलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याला पाहुन प्रत्येक जण अवाक् होत आहे.

    काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये

    या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा हातात गुलाब घेऊन मेट्रोमध्ये येतो आणि गुडघ्यावर बसतो. हे पाहून तुम्हाला वाटेल की त्याला कोणाला तरी प्रपोज करायचे आहे. मात्र, मेट्रो पुढच्या स्टेशनवर थांबली की समोरून एक मुलगा चढतो. मग मांडीवर बसलेला मुलगा त्याल फुलं देऊन मिठी मारतो. हे सगळ पाहून प्रवासी हसू लागतात  तसेच तिथे उभ्या असणाऱ्या एका मुलीच्या चेहऱ्यावरील यावेळी भाव पाहण्यासारखे असतात.

    व्हिडिओ होतोय व्हायरल

    मेट्रोमधील हा  व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून  सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर @ProfesorSahab नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे- दिल्ली मेट्रो लवकर बरी व्हा. 19 सेकंदांची ही क्लिप आतापर्यंत 73 हजार वेळा पाहिली गेली असून अनेक मजेदार कमेंट्सही आल्या आहेत.

    दिल्ली मेट्रोमध्ये आता असणार फ्लाइंग स्क्वॉड्स

    गेल्या अनेक दिवसापासुन दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. अखेर या मागणीचाी दखल घेत असे आक्षेपार्ह कृत्य रोखण्यासाठी डीएमआरसीने निर्णय मोठा  साधला. दिल्ली मेट्रोमध्ये अशा प्रकारच्या अश्लील कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी DMRC ने फ्लाइंग स्क्वॉड्स स्थापन करण्यात येणार आहे. तसेच गरज पडल्यास या फ्लाइंग स्क्वॉड्सची संख्या वाढवण्याचा तसेच चेकिंग आणि मॉनिटरिंग अधिक कडक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    डीएमआरसीने प्रवाशांना ‘हे’ आवाहन केले आहे

    डीएमआरसीच्या वतीने इतर जबाबदार प्रवाशांनाही आवाहन करण्यात आले आहे की, मेट्रोमध्ये असे काही आक्षेपार्ह कृत्य दिसल्यास डब्यातील आपत्कालीन बटण दाबून ट्रेन ऑपरेटरला त्वरित कळवावे. अशा लोकांच्या कारवाया थांबवण्यासाठी इतर प्रवाशांची तत्परता खूप महत्त्वाची आहे, लाखो प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. या काळात सर्व प्रवाशांवर लक्ष ठेवणे शक्य नसल्याने इतर जबाबदार प्रवाशांचेही सहकार्य आवश्यक असल्याचही त्यांनी म्हण्टलंय.