प्रेयसीला रोमँटिक स्टाईलमध्ये करत होता प्रपोज, मग कुत्र्याने केले क्यूट कृत्य

व्हायरल क्लिप (Viral Clip) मध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्रकिनारी (Sea Shore) एक व्यक्ती आपल्या मैत्रिणीला लग्नासाठी प्रपोज (Propose To Girl Friend) करत आहे. गुडघ्यावर बसून तो प्रेयसीला अंगठी देणार आहे की, त्याचा पाळीव कुत्रा (Pet Dog) एवढा क्यूट कृत्य करतो की, दोघेही हसायला लागतात.

    मैत्रिणींना लग्नासाठी प्रपोज करणं (Propose To Girl Friend) ही सुद्धा एक कला आहे, ज्यात प्रत्येकजण तज्ज्ञ नसतो. अशा परिस्थितीत लोक गुगलचा (Google) आधार घेतात. कारण असे अनेक व्हिडिओ आणि पद्धती आहेत, ज्यामुळे एखाद्याचा सामान्य प्रपोजल रोमँटिक होऊ शकतो. मात्र, अशा परिस्थितीत नशीब काही लोकांना साथ देते. जसं यांच्या नशिबी आलं ! वास्तविक, हा माणूस आपल्या मैत्रिणी आणि कुत्र्यासोबत समुद्रकिनारी गेला होता.

    यादरम्यान, तो आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी गुडघे टेकून बसतो, पण नंतर त्याचा कुत्रा अशा पद्धतीने वागतो की दोघेही खळखळून हसतात. नक्कीच कुत्र्याच्या क्यूट कृतीमुळे हा प्रस्ताव केवळ संस्मरणीयच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.

    व्हिडिओत आहे काय?

    व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्रकिनारी एक व्यक्ती आपल्या मैत्रिणीला लग्नासाठी प्रपोज करत आहे. गुडघ्यावर बसून तो प्रेयसीला अंगठी देताना प्रपोज करतो. मात्र यादरम्यान त्याचा पाळीव कुत्रा पळू लागतो. प्रथम तो कॅमेराकडे वळतो. मग आनंदात दाम्पत्याभोवती धावपळ सुरू होते. गोल्डन रिट्रिव्हर जातीच्या या कुत्र्याचे नाव आहे सोनी, ज्याच्या गोंडसपणाने लोकांची मने जिंकली आहेत.

    कुत्र्याने हा क्षण संस्मरणीय बनवला

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Good News Dog (@goodnewsdog)

    @goodnewsdog या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – कुत्र्याच्या प्रतिक्रियेने ते आणखी चांगले केले. त्याचवेळी व्हिडीओवर लिहिले आहे की, त्याला वाटले की आपण एक फोटो काढणार आहोत.