Bride and groom set themselves on fire

एका लग्नात वधू-वराने लग्नादरम्यान स्वत:ला पेटवून पाहुण्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. वाचून धक्का बसेल, पण हे खरे आहे. सध्या या वर-वधूचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये दिसणारे वर वधूचे नाव अंबीर बंबीर आणि गाबे जेसप असे आहे. आपण पाहिलेल्या अनेक लग्नात वर-वधूंच्या स्वागतासाठी आणि निरोप देताना फुलांचा वापर करण्यात येतो. मात्र या जोडप्याने एक वेगळाच फंडा अवलंबवला(Bride and groom set themselves on fire).

    दिल्ली : एका लग्नात वधू-वराने लग्नादरम्यान स्वत:ला पेटवून पाहुण्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. वाचून धक्का बसेल, पण हे खरे आहे. सध्या या वर-वधूचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये दिसणारे वर वधूचे नाव अंबीर बंबीर आणि गाबे जेसप असे आहे. आपण पाहिलेल्या अनेक लग्नात वर-वधूंच्या स्वागतासाठी आणि निरोप देताना फुलांचा वापर करण्यात येतो. मात्र या जोडप्याने एक वेगळाच फंडा अवलंबवला(Bride and groom set themselves on fire).

    दोघांनी फायर प्रूफ कपडे घातले आणि अंगावर अँटी बर्न जेल देखील लावले होते. यानंतर त्यांनी पाठीवर आग लावली आणि कार्यक्रमस्थळाचा निरोप घेतला.

    डीजे आणि वेडिंग फोटोग्राफर रॉस पॉवेल यांनी हा व्हीडिओ सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट केला. दाम्पत्याच्या केसांना आग लागल्याने लोक अस्वस्थ झाले. यावर पॉवेलने स्पष्ट केले की, त्या दोघांच्या केसांवर आणि चेहऱ्यावर अँटी-बर्न जेल लावण्यात आले होते, त्यानंतर त्यावर विग लावला होता.

    आतापर्यंत 13 लाखांहून अधिक वेळा हा व्हीडिओ पाहिला गेला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओमध्ये, संपूर्ण स्टंट दरम्यान हे जोडपे शांत होते आणि शेवटी अशा टप्प्यावर पोहोचले जिथे दोघांनीही आगीसमोर गुडघे टेकले. यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग विझवली.