
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच एका नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाठवणीच्या वेळी नववधू मजेशीर डान्स करत घरातून निघत आहे. गंमत म्हणजे नववधू (Bride Dancing On Bidai Viral Video) ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’(Gadiwala Aaya Gharse Kachra Nikal) या गाण्यावर नाचत आहे.
सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. अशातच सोशल मीडियावर(Social Media) लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडिओ समोर येत आहेत. सोशल मीडियावर वधू-वरांचे नाचतानाचे अनेक व्हिडीओ(Viral Video) बघायला मिळत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका वधूच्या(Bride Dancing Video) निरोपाचा आहे. यामध्ये नववधू दुःखी नसून पाठवणीच्या वेळी आनंदी दिसत आहे. पाठवणीच्या वेळी ही नववधू मजेशीर डान्स करत घरातून निघत आहे. गंमत म्हणजे नववधू (Bride Dancing On Bidai Viral Video) ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ (Gadiwala Aaya Gharse Kachra Nikal) या गाण्यावर नाचत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा वधू सुरुवातीला घरातून बाहेर पडते तेव्हा ती खोटे अश्रू पुसताना दिसते. त्यानंतर ती हसायला लागते. त्यानंतर व्हिडिओमध्ये ‘गाडीवाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे वाजताना ऐकू येते. यानंतर नववधू या गाण्यावर डोलायला लागते. ती तिचा लेहेंगा उचलते आणि नाचू लागते. फेअरवेल विथ ट्विस्ट’ नावाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ theweddingstories नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या वधूचे नाव मानसी गोस्वामी आहे. ती एक मेकअप आर्टिस्ट आहे.