bridge collapsed in brazil

सोशल मीडियावर (Social Media) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पूल अचानक वाहत्या पाण्यात कागद वाहून जातो (Viral Video Of Bridge Collapsed)  त्याप्रमाणे वाहून गेला आहे. तसेच या पूलावरून जाणारे अनेक लोक त्यांच्या वाहनांसह होड्यांप्रमाणे वाहून गेले.

  सोशल मीडियावर (Social Media) नेहमी वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पूल अचानक वाहत्या पाण्यात कागद वाहून जातो ( Viral Video Of Bridge Collapsed)  त्याप्रमाणे वाहून गेला आहे. तसेच या पूलावरून जाणारे अनेक लोक त्यांच्या वाहनांसह होड्यांप्रमाणे वाहून गेले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meme wala (@memewalanews)

  या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून एक माणूस कोणाची तरी वाट पाहत आहे. तर दुसरीकडे नदीवर बांधलेल्या पुलावरून लोकांची सतत ये-जा सुरू आहे. पुलावर गर्दी नसली तरी पाण्याचा जोरदार प्रवाह नक्कीच वाहताना दिसतो. काही वेळाने तो पूल भरल्यानंतर तो कोसळतो आणि ते भयानक दृश्य पाहून आजूबाजूचे लोक पळून जातात. पूल कोसळल्यानंतर अनेक लोक पाण्यात तरंगताना दिसत आहेत.

  memewalanews नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ ब्राझीलमधील कुठल्यातरी ठिकाणचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या व्हिडीओविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही.