buffallow in swimming pool

म्हशींचा स्विमिंग पूलमध्ये डुंबतानाचा व्हिडिओ @thandojo नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

    सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ(Viral Video) आपण बघत असतो. यापैकी काही व्हिडीओ हे प्राण्यांच्या करामती दाखवणारे असतात. हे व्हिडिओ पाहण्यात लोकांचा वेळ कसा निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच समजत नाही. सध्या एक असाच व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. सध्या तापमान वाढीमुळे उन्हाच्या झळा लागत आहेत. अंगाची लाहीलाही करत आहेत. त्यात उकाड्यानं हैराण झाल्यावर स्विमींग टँक मध्ये डुंबायला कोणाला आवडणार नाही. सध्या काही म्हशींचा व्हिडिओ व्हायरल (Buffalo Viral Video) झाला आहे. या म्हशी चक्क स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Trending Video)

    25 लाख रुपयांचे नुकसान
    म्हशींचा कळप एका जोडप्याच्या नव्याकोऱ्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना आढळला. जवळच्या शेतातून 18 म्हशी पळून गेल्या आणि अचानक एका जोडप्याच्या घराबाहेर असलेल्या स्विमिंग पूलजवळ आल्या. या म्हशींच्या जलक्रिडेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमुळे मिळाला आहे. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अनेक म्हशी त्या स्विमिंग पूलमध्ये पोहोचल्या आणि एकामागून एक पाण्यात उड्या मारू लागल्या. जोडप्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. अँडी आणि लिनेट स्मिथ असं या स्विमिंग पूलचे मालक असलेल्या जोडप्याचं नाव आहे.

    म्हशींचा स्विमिंग पूलमध्ये डुंबतानाचा व्हिडिओ @thandojo नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरीही या व्हिडिओवर वेगवेगळया प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हंटलंय या म्हशींनी मालकाला चांगलंच कामाला लावलंय. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.