बापरे..टॉयलेट सीटच्या आत लपून बसला होता किंग कोब्रा, अशा प्रकारे केले रेस्क्यू.. Video Viral

किंग कोब्राचा रेस्क्यू व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये टॉयलेटमध्ये लपलेला साप रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ दिसत आहे.

    Cobra Found in Washroom : साप (King Cobra) कुठेही लपून राहू शकतात. मग ती बाईक असो, कार असो किंवा तुमच्या घराचा कोणताही कोपरा असो. सापांना लपण्यासाठी उबदार, कोरडी आणि अंधार असलेली जागा आवडते. तुम्ही इंटरनेटवर सापाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यात काही सापाला रेस्क्यू करतानाचेही व्हिडिओ आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) किंग कोब्राला अशा ठिकाणाहून बाहेर काढले असेल असा तुम्ही विचारही करू शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रेस्क्यू करणाऱ्याने सापाला शेपटीने पकडून टॉयलेट सीटमधून बाहेर काढले आहे. खरं तर, कोब्रा ज्या प्रकारे टॉयलेट सीटच्या आत लपून बसला होता, त्यावरून तिथे साप असेल याचा अंदाज कुणालाही आला नव्हता. यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, ज्याला पाहून भारतीय स्वच्छतागृहं वापरणारे सगळेच घाबरले!


    हा व्हिडिओ इन्स्टाग्राम पेज ‘नवीन स्नेक’ (@snake_naveen) वर पोस्ट करण्यात आला. यामध्ये आपण पाहू शकतो की बाथरूममध्ये एक किंग कोब्रा भारतीय टॉयलेट सीटमध्ये लपून बसला आहे. साप पकडणारा पहिल्यांदा त्याची शेपूट अतिशय काळजीपूर्वक पकडतो आणि नंतर हळूहळू साप बाहेर काढतो, आणि शेवटी सापाला प्लास्टिकच्या डब्यात घेऊन जातो.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Naveen snake (@snake_naveen)

    नवीनने सापांना वाचवतो, त्याला इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक लोकं फॉलो करतात. त्याच्या इन्स्टा बायोनुसार, तो कर्नाटकातील कनकापुरा येथील रहिवासी आहे आणि प्राण्यांना वाचवण्याचे काम करतो.

    या व्हिडिओला 7 लाख 82 हजार व्ह्यूज आणि 23 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत.