दिल्ली मेट्रोमध्ये पुुन्हा लिपलॅाक करताना दिसलं जोडपं! एकमेकांच्या मिठीत गुंग, व्हिडिओ व्हायरल

दिल्ली मेट्रोमध्ये दाराजवळ उभं राहून ओठांना कुलूप लावून जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना सार्वजनिकरित्या किस करताना दिसत आहेत.

    दिल्ली : गेल्या अनेक दिवसापासुन दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असे आक्षेपार्ह कृत्य रोखण्यासाठी मेट्रो व्यवस्थापन प्रयत्न करत असूनही लोकं ऐकायला तयार नसल्याचं दिसत आहे. आता एकदा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपे मेट्रोच्या आत लिप लॉक करताना दिसत (Delhi Metro Liplock Video) आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

    व्हायरल व्हिडिओमध्ये काय

    व्हायरल व्हिडिओमध्ये हे जोडपे मेट्रोच्या दरवाजाजवळ उभे राहून एकमेकांना चिकटून लिप-लॉक करण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. यादरम्यान इतर अनेक प्रवासीही मेट्रोने प्रवास करत आहेत. आनंद विहार मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर या जोडप्यावर टीका केली आहे.
    रवी कुमार नावाच्या एका युझर लिहिले, ‘डीएमआरसी विभाग अतिशय लज्जास्पद आहे… कोणतेही चांगले कुटुंब मेट्रोमध्ये प्रवास करू शकत नाही कारण या सर्व घाणेरड्या गोष्टी तिथे घडतात. कोणी थांबत नाही. थोडी तरी लाज बाळगा. लोक एवढी चांगली मेट्रो घाण करत आहेत पण तुम्ही लोक हे सर्व पहात आहात. या रसिकांसाठी ही मेट्रो बनवली होती का?
    दिल्ली मेट्रोमधील अशा अश्लील कृत्याचा हा पहिलाच व्हिडिओ नाही जो व्हायरल झाला आहे. याआधीही एक जोडपं मेट्रोमध्ये जमिनीवर बसून लिप लॉक करताना दिसलं होतं. यापूर्वी दिल्ली मेट्रोच्या सीटवर बसून एक तरुण हस्तमैथुन करताना दिसला होता. दिल्ली मेट्रोमध्ये शॉर्ट स्कर्ट घालून नाचताना आणि भांडण आणि शिवीगाळ करतानाचे व्हिडिओही यापूर्वी व्हायरल झाले आहेत.