A-crane-collapsed-during-th

या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून त्यात अनेक लोक क्रेनला लटकलेले दिसत आहेत. त्याच्या हातात पुष्पहार आहे, तो मूर्तींना हार घालण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, नियंत्रण सुटल्याने क्रेन खाली पडली.

    तामिळनाडूमधील (Tamilnadu) अरकोनम (Archonum) येथील मंडियमम्‍मन मंदिरात (Mandiyammaman Temple) उत्सवादरम्यान क्रेन कोसळली (A crane collapsed during the festival). या अपघातात ४ जणांचा मृत्यू (4 Died) झाला आहे. तर ९ जण जखमी झाले आहेत (9 people are injured). पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्रेन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे (The Crane Driver Has Been Detained). उत्सवात क्रेनचा वापर करण्यास परवानगी नव्हती (Cranes were not allowed to be used in the festival).

    घटना रविवारी सायंकाळची आहे. अरक्कोनम येथील मंडिअम्मन मंदिरात मायलेरू उत्सव सुरू होता. यावेळी क्रेनला लटकून तिघेजण देवाच्या मूर्तीला हार घालत होते. त्यानंतर क्रेनचे नियंत्रण बिघडले आणि ती खाली पडली.

    नियंत्रण सुटल्याने क्रेन उलटली

    या अपघाताचा व्हिडिओही (Shocking Video Viral) समोर आला असून त्यात अनेक लोक क्रेनला लटकलेले दिसत आहेत. त्याच्या हातात पुष्पहार आहे, तो मूर्तींना हार घालण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, नियंत्रण सुटल्याने क्रेन खाली पडली. अपघातानंतर मंदिरात चेंगराचेंगरी झाली. काही लोकांनी क्रेनखाली दबलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

    पाहा व्हिडिओ :