Death machines can cause death to be experienced before death

विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मनुष्याने कित्येक संकटांवर मात केली असली तरी अजूनही मृत व्यक्तींना जिवंत करण्याचे कसब तंत्रज्ञानाला अवगत झालेले नाही. त्याबाबत जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये संशोधन सुरू आहे. याचाच भाग म्हणून लंडनच्या शास्त्रज्ञांनी मानवी डोळ्यांशी संबंधित एक मोठे संशोधन केले आहे(Dead Human Will Be Alive).

  विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मनुष्याने कित्येक संकटांवर मात केली असली तरी अजूनही मृत व्यक्तींना जिवंत करण्याचे कसब तंत्रज्ञानाला अवगत झालेले नाही. त्याबाबत जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये संशोधन सुरू आहे. याचाच भाग म्हणून लंडनच्या शास्त्रज्ञांनी मानवी डोळ्यांशी संबंधित एक मोठे संशोधन केले आहे(Dead Human Will Be Alive).

  मृत दात्याच्या डोळ्यांना पुन्हा जिवंत करता येऊ शकते, याच प्रक्रियेवरून मृत व्यक्तीच्या मेंदूलाही जिवंत करता येऊ शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. यूटा विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.

  पाच तास पेशींमध्ये प्रतिक्रिया

  या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी एक विशिष्ट घटक तयार केला. दात्याचा डोळा काढल्यानंतर त्यातला ऑक्सिजन आणि इतर पोषणमूल्यांची कमतरता भरून काढेल, अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली. रेटिनामधल्या पेशी प्रकाशावर आधारित प्रतिक्रिया देतात, इतकेच नाही तर मृत्यूनंतर पाच तासांनीही त्या प्रतिक्रिया तशाच असतात, असा दावा या संशोधनामध्ये करण्यात आला आहे.

  मृत्यूनंतर पाच तासांनीही या पेशी प्रकाशानुसार प्रतिक्रिया देण्याइतक्या आणि एकमेकींशी संवाद साधण्याइतक्या सक्षम होत्या. विविध प्रसंगांमधून रेकॉर्ड केलेले संकेत जिवंत व्यक्तींप्रमाणे त्या पेशी एकमेकींना पाठवत होत्या, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

  शास्त्रज्ञांना मिळाले बळ

  रेटिनामधले हे न्यूरॉन्स मेंदू, पाठीचा कणा आणि चेतासंस्थेचा भाग आहेत. त्यामुळे याचप्रमाणे चेतासंस्थेतल्या इतर पेशींनाही हे संशोधन लागू करता येऊ शकते, असे संशोधकांना वाटते. तसे झाले तर मेलेला माणूस जिवंत होऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे. या अभ्यासावरून एक स्पष्ट होते की, मेंदू मृत झाल्यानंतर तो पुन्हा जिवंत होऊ शकत नाही हे जरी खरे असले, तरी रेटिनामधल्या या पेशींचा शोध मृत व्यक्तीला जिवंत करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक मानला जाऊ शकतो, असे नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

  माणसाच्या डोळ्यातल्या मॅक्युला या भागामधले फोटोरिसेप्टर पेशींना जिवंत करणे आम्हाला शक्य होतं. या पेशी माणसाची मुख्य दृष्टी, बारीकशी हालचाल आणि रंग ओळखण्याच्या आपल्या क्षमतेसाठी कारणीभूत ठरणाऱ्या रेटिनाचा भाग आहेत, असे यूटा विश्वविद्यालयातल्या प्रमुख लेखिका डॉ. फातिमा अब्बास यांनी म्हटले आहे.

  नवीन उपचारांकरिता संशोधनात मदत

  येल विद्यापीठाने 2019 मध्ये एक नवा शोध लावला होता. त्यात चार तासांपूर्वी मेलेल्या 32 डुकरांचा मेंदू पुन्हा सुरू करण्यात आला होता. त्या प्रमाणेच आताचं संशोधनही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या शोधामुळे नवीन उपचारांकरिता संशोधनात साह्य मिळेल, तसंच मेंदूंवरच्या आजारांसंदर्भात नव्या अभ्यासाला चालना मिळेल. अशा प्रकारचे संशोधन मानवाच्याच नाही, तर इतरही प्राणिमात्रांच्या मेंदूशी संबंधित आजारांबाबत उपयोगी ठरू शकते.