डिलिव्हरी बॉय आला अन् चप्पल चोरुन गेला: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

डिलिव्हरी बॉयने केलेल्या या चोरीमुळे नेटकरी देखील अवाक झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हे एक सीसीटीव्ही फुटेज असून यामध्ये चोरी करताना डिलिव्हरी बॉय कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. डिलिव्हरी बॉयने केलेल्या या चोरीमुळे नेटकरी देखील अवाक झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    सध्याच्या डिजीटल युगामध्ये आपण अनेक गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करणे पसंत करतो. जीवनाश्यक वस्तू, कपडे यांसह खाण्याचे पदार्थ देखील ऑनलाईन मागवले जातात. डिलिव्हरी बॉय या गोष्टी घरपोच आणून देत असतो. मात्र वस्तू आणून देणारा डिलिव्हरी बॉयचं चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्वीगीचा डिलिव्हरी बॉय घराबाहेरील बुट चोरी करत असल्याचे दिसून आले आहे.

     

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्विगीचा डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी आला असून सुरूवातीला तो दाराची बेल वाजवतो. दरवाजा उघडेपर्यंत तो आजूबाजूला पाहून परिस्थितीचा आढावा घेतो. त्यानंतर काही वेळाने घरातून दरवाजा उघडून एक महिला पार्सल घेते. पार्सल घेतल्यानंतर तो पायऱ्या उतरून गेल्याचे नाटक करतो अन् पुन्हा येऊन शूज घेऊन पसार होतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अवघ्या काही काळातच तो व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील व्हिडिओवर कमेंटसचा वर्षाव केला आहे.