deserted road and bike broken at midnight family on the road what happened next video went viral humanity is still alive nrvb
Image-Twitter-@HasnaZarooriHai

लष्कराच्या दोन जवानांनी मध्यरात्री पीडित कुटुंबाला मदत करून सर्वांची मने जिंकली (Army Men Help To Aggrieved Family). व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, अर्ध्या रात्री एक कुटुंब सुनसान रस्त्यावर उभे आहे, ज्याची दुचाकी खराब झाली आहे.

नवी दिल्ली : आपल्या सर्वांना माहिती आहे की, देशातील लोकांच्या मदतीसाठी लष्कराचे जवान (Army Men) नेहमीच तत्पर असतात. कुठलेही संकट आले तरी ते शक्य तिथे मदतीला (To Help) येतात. त्यामुळेच देशातील नागरिकांना त्यांचा सदैव अभिमान आहे आणि राहील. जवानांकडून करण्यात येत असलेल्या मदतीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Helping Photos And Videos Viral On Social Media) होत आहेत. अशा परिस्थितीत आता आणखी एक व्हिडीओ समोर आला असून पुन्हा एकदा जवानांचे मन किती मोठं आहे हेच या निमित्ताने अनुभवायला मिळाले. हा व्हिडिओ लोकांच्या काळजाला भिडणारा आहे.

लष्कराच्या दोन जवानांनी मध्यरात्री पीडित कुटुंबाला मदत करून सर्वांची मने जिंकली (Army Men Help To Aggrieved Family). व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, अर्ध्या रात्री एक कुटुंब सुनसान रस्त्यावर उभे आहे, ज्याची दुचाकी खराब झाली आहे. त्यांनी मदत घेण्याचा विचार केला तरी आजूबाजूला कोणीच नाही. तेवढ्यात दोन लष्करी जवान दुचाकीवर येऊन थांबतात.

त्यानंतर ते बिघडलेली दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करतात, मात्र दुचाकी सुरू होत नाही. अशा परिस्थितीत जवान मदत करतात आणि त्यांची दुचाकी त्या कुटुंबाला देतात. जवान त्यांना त्यांचा नंबर देतो जेणेकरून गाडी तयार झाल्यावर ती योग्य पत्त्यावर पाठवता येईल.

काळजाला भिडणारा हा व्हिडिओ @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर आयडीवर शेअर करण्यात आला आणि त्याला ‘देशाच्या खऱ्या वीरांना सलाम आणि आदर’ असे कॅप्शन देण्यात आले. दोन मिनिटे २० सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओने काही वेळातच इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वी असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. असे व्हिडिओ नेटकऱ्यांना नेहमीच आवडतात.