doctors fighting with each other leaving the patient during operation weird video creating sensation on social media nrvb

होय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की काही डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये एकत्र रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत आणि अचानक दोन डॉक्टरांमध्ये काही मुद्द्यावरून भांडण झाले. यानंतर दोघेही एकमेकांशी भांडतात आणि वाद घालू लागतात.

  नवी दिल्ली: आपण डॉक्टरर्सना (Doctors) देवाचे (God) दुसरे रूप मानतो, कारण लोकांचा असा विश्वास आहे की देवानंतर फक्त डॉक्टरच आपला जीव वाचवू शकतात. मात्र, रुग्णाची काळजी घेण्याऐवजी डॉक्टरच भांडू लागले (Weird Doctors Fighting), तर सर्वसामान्यांना थोडं आश्चर्य वाटतं. होय, तुम्हाला आश्चर्य वाटले का? सोशल मीडियावर (Social Media) एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. जेव्हा रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये (Operation Theater) शस्त्रक्रियेसाठी (Operation) नेले जाते तेव्हा उपस्थितांना वाटते की आतील डॉक्टर खूप गांभीर्याने ऑपरेशन करत असावेत, परंतु एक प्रकरण समोर आले आहे ज्यामुळे तुम्हाला राग येईल.

  ऑपरेशन दरम्यान दोन डॉक्टरच एकमेकांना भिडले आणि झाली हाणामारी

  ऑपरेशन थिएटरमध्ये काय होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जसे आपण ऐकत आलो आहोत, डॉक्टरांची टीम रुग्णाची शस्त्रक्रिया करते आणि बाकीचे लोक त्यांच्या मदतीसाठी उभे असतात. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. होय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की काही डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये एकत्र रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत आणि अचानक दोन डॉक्टरांमध्ये काही मुद्द्यावरून भांडण झाले. यानंतर दोघेही एकमेकांशी भांडतात आणि वाद घालू लागतात. त्याचवेळी ऑपरेशन थिएटरमधून कोणीतरी आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने सर्व काही रेकॉर्ड केले.

  हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना धक्काच बसला

  व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, रुग्ण स्ट्रेचरवर पडलेला आहे आणि डॉक्टरांसह संपूर्ण टीम त्याच्याभोवती उभी आहे आणि त्यानंतर आणखी एका डॉक्टर असं काही बोलला की, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर भडकले आणि त्यांनी आपापसातच वाद घालण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहताच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. आतून लाइव्ह फुटेज समोर आल्यावर लोकांना धक्काच बसला.

  व्हायरल होतोय व्हिडिओ

  आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. rajkotmirrornews ने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, “असा व्हिडिओ रेकॉर्ड करून पोस्ट केल्याबद्दल कॅमेरामनचे आभार. डॉक्टरर्सना त्यांच्या नोकरीवरून निलंबित केले पाहिजे.” मात्र हा व्हायरल व्हिडिओ आला कुठून आणि कधीचा आहे, याची माहिती उपलब्ध नाही आणि नवराष्ट्रही त्याला दुजोरा देत नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.