आजीबाईंची बाइक रायडिंग तरुणांनाही लाजवेल, व्हिडिओ पाहून सारेच थक्क.. Viral Video

आजीबाईंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आजीबाई बाइक रायडिंग करताना दिसत आहेत.

  Viral Video : अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होतात. मात्र, काही मोजकेच व्हिडिओ असे असतात की ते लोकांचे लक्ष वेधून घेतात. आता सोशल मीडियाच्या दुनियेतून एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक आजीबाई मोटरसायकल चालवताना दिसत आहेत. आजीबाईंची ही स्टाईल पाहून सारेच थक्क झाले आहेत.

  बाइकवर दुसरी महिला नुसती बसली आहे. दोन्ही महिला बाईक रायडिंगचा आनंद घेत आहेत. हा व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आहे. साडी नेसलेली ही आजी मोपेड वेगाने चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर दुसरी महिला त्यांच्या मागे बसून प्रवासाचा आनंद घेत आहे. एवढंच नाही तर व्हिडिओ काढणाऱ्या त्या व्यक्तीकडे पाहून दोघीही कॅमेराला हात दाखवत आहेत आणि फ्लाईंग किसही देत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shabeerzyed (@shabzyed)

  10 लाखांहून अधिक व्ह्यूज

  हा व्हिडिओ शाबीर झायेद या युजरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावर आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. तर 10 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक इंस्टाग्राम यूजर्सनी आजीबाईंच्या मोटरसायकल राईडचे कौतुक केले आहे. तर काही लोक व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत आणि म्हणत आहेत की त्याने अशी घटना कॅप्चर केली आहे, जी पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shabeerzyed (@shabzyed)

  आजच्या जगात असे सुंदर व्हिडिओ क्वचितच पाहायला मिळतात, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल. या व्हिडिओचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले की, ‘वय हे एक निमित्त आहे ‘. म्हणूनच या वयाच्या बंधनात कोणीही अडकू नका आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या.