sabyasachi trolled for mangalsutra and bra

प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) सब्यसाची मुखर्जीही (Sabyasachi) आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीमुळे ट्रोल ( Sabyasachi Trolled For Mangalsutra Advertisement Campaign)) होत आहे.

  दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असल्यानं, सध्या देशात उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादक कंपन्या अनेक सवलती जाहीर करत आहेत. तसेच मोठ्या ब्रँडसच्या आकर्षक जाहिरातींचाही मारा सुरू आहे. अशातच प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) सब्यसाची मुखर्जीही (Sabyasachi) आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीमुळे ट्रोल ( Sabyasachi Trolled For Mangalsutra Advertisement Campaign)) होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sabyasachi (@sabyasachiofficial)

  बॉलिवूड सेलिब्रिटीजचे फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी काही दिवसांपूर्वी सब्यसाचीचे एक नवे ज्वेलरी कलेक्शन लाँच केले आहे. त्यात लेटेस्ट मंगळसूत्र कलेकशनच्या( Sabyasachi Mangalsutra Collection) जाहिरातीचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवरुन सब्यसाची यांना चांगलीच टीका सहन करावी लागत आहे.

  या पोस्टमध्ये सव्यसाची यांनी जो फोटो शेअर केला आहे, त्यात एक जाड्या फिमेल मॉडेलने अंतर्वस्त्रांवर मंगळसूत्र परीधान केले आहे. मॉडेलसोबत मेल मॉडेलही शर्टलेस दिसतो आहे. सब्यसाची यांनी याच प्रकाराचा दुसरा फोटोही शेअर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sabyasachi (@sabyasachiofficial)

  सब्यसाची यांच्यावर जोरदार टीका
  मंगलसूत्रांच्या जाहीरातीच्या कॅम्पेनचे हे फोटो पाहून त्यांच्यावर ट्रोलर्स तुटून पडले आहेत. ही मंगळसूत्राची जाहिरात आहे की अंतर्वस्त्राची हेच कळत नाही, अशी टीका एका यूझरने केली आहे. तर सब्यसाची यांच्याकडून अशा कॅम्पेनची अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया दुसऱ्या युझरने व्यक्त केली आहे. तुमचे हे दागिने कुणीच खरेदी करणार नाही, कारण हे मंगळसूत्र खरेदी केले तर आपण असे दिसू असे ग्राहकांना वाटेल, अशी प्रतिक्रिया काही यूझर्सनी दिल्या आहेत. एका यूझरने तर ही मंगळसूत्राची जाहिरात आहे की कामसूत्राची अशीही विचारणा केली आहे.

  हा तर हिंदू संस्कृतीवर हल्ला
  जाहिरातीचे कॅम्पेन करण्यासाठी दुसरा कोणता मार्ग नव्हता का, असा प्रश्नही विचारण्यात येतो आहे. हा पॉर्न ज्वेलरीचा हब आहे, त्यामुळे याच्यावर बहिष्कार घाला अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेक युझर्सनी हा हिंदू संस्कृतीवर हल्ला असल्याचे सांगत सव्यसाची यांच्यावर जोरदार टीका केली आहे.