कुत्र्याच्या बर्थडेचं असही सेलिब्रेशन; १०० किलोंचा केक, ५००० पाहुणे

लाडका कुत्रा 'कृष' त्याचा वाढदिवसाच्या बर्थडे पार्टीमध्ये रेशमी शाल आणि टोपी घातलेला दिसला. मालक शिवप्पा यांनी कृषसोबत हा केक कापला.

    काही जण आपल्या पाळीव प्राण्यावर खूप प्रेम करतात. त्याच्यासाठी वाटेल ते करतात. त्यातही कुत्र्याचा वाढदिवस साजरा करणं यात काही नाविण्य नाही मात्र, कनार्टकातील एका श्वानप्रेमीनं त्याच्या कुत्र्याच्या वाढदिवसाला तब्बल १०० किलोचा केक मागवाला. या बर्थडे पार्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    शिवप्पा मार्डी हे या कुत्र्याच्या मालकाचे नाव आहे. ज्यांनी आपल्या कुत्र्या्च्य वाढदिवसावक एवढा खर्च केला आहे. या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या गावातील सुमारे 5 हजार लोकांना 3 क्विंटल चिकन, 1 क्विंटल अंडी आणि 50 किलो शाकाहारी जेवण देण्यात आले. कुत्र्याचे मालक शिवप्पा मार्डी हे गेल्या 20 वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. कुत्र्याचा वाढदिवस एवढ्या मोठ्या थाटात साजरा करण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे एकदा एका नवीन सदस्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जुन्या सदस्यांचा अपमान केला आणि आपल्या कार्यकाळात कुत्र्यासारखे खाल्ले अशी टिप्पणी केली. सदस्याच्या टिप्पण्यांना प्रतिसाद देण्यासाठी, शिवप्पाने आपल्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस आलिशान पार्टी देऊन साजरा केला.

    लाडका कुत्रा ‘कृष’ त्याचा वाढदिवसाच्या बर्थडे पार्टीमध्ये रेशमी शाल आणि टोपी घातलेला दिसला. मालक शिवप्पा यांनी कृषसोबत हा केक कापला. मात्र यावेळी कुत्रा कृष याला मात्र आपल्या आजूबाजूला काय होत आहे, याबाबत काहीच कल्पना नव्हती. कृषच्या वाढदिवसानिमित्त शिवप्पा यांनी पाच हजारहून अधिक जणांना मेजवानीही दिली.