१८ व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून खाली पडली ८२ वर्षीय महिला पण काहीही झाले नाही, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल God Tussi Great Ho

ती तिच्या अपार्टमेंटच्या १८ व्या मजल्यावरच्या बाल्कनीत कपडे सुकवत होती तेव्हा ती अचानक बाल्कनीतून खाली पडली. या व्हिडिओमध्ये १८ व्या मजल्यावरील बाल्कनीच्या कपड्याच्या रॅकवर महिलेचे दोन्ही पाय आणि १७व्या मजल्यावर बाल्कनीत शरीर लटकलेलं दिसत आहे.

    चीन : सोशल मीडियावर (Social Media) अशी एक घटना व्हायरल होत आहे, जी पाहून सगळेच हैराण झाले आहेत. वास्तविक, अशी एक गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाली आहे जी घाबरवणारी आहे. (Viral Video) मध्ये ८२ वर्षीय महिला इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून पडल्यानंतर कपड्याच्या रॅकला उलटे लटकताना दिसत आहे. या व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे.

    साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने (South China Morning Post) दिलेल्या माहितीनुसार, ही महिला दक्षिण चीनच्या जिआंगसू (Jiangsu) प्रांतातील यांगझोऊची (Yangzhou) रहिवासी आहे. ती तिच्या अपार्टमेंटच्या १८ व्या मजल्यावरच्या बाल्कनीत कपडे सुकवत होती तेव्हा ती अचानक बाल्कनीतून खाली पडली. या व्हिडिओमध्ये १८ व्या मजल्यावरील बाल्कनीच्या कपड्याच्या रॅकवर महिलेचे दोन्ही पाय आणि १७व्या मजल्यावर बाल्कनीत शरीर लटकलेलं दिसत आहे.

    महिलेला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले. बचावकर्त्यांनी तिला १८व्या आणि १७व्या मजल्यावरून पकडले, त्यानंतर तिला दोरीने बांधून तिची सुटका करण्यात आली. महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली, यादरम्यान तिला कोणतीही दुखापत झाली नाही. महिलेची सुटका करण्यात आल्यानंतर घटनेचा तपास करण्यात आला, ज्यामध्ये ती बाल्कनीत धुतलेले कपडे सुकवण्यासाठी गेली असता तिचा पाय घसरल्याचे उघड झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अशा प्रकारे महिलेला वाचवल्याबद्दल अग्निशमन दलाच्या जवानांचेही लोक कौतुक करत आहेत.