sujay vikhe patil and gaurav more

गौरवने “महापशुधन एक्स्पो 2023 शिर्डीमध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील साहेब यांच्याबरोबरचा एक खास क्षण,” असं कॅप्शन देत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो आणि सुजय विखे एकत्र नाचताना दिसत आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) फेम गौरव मोरे (Gaurav More) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाशिवाय इतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतो. तिथले फोटो, व्हिडिओ तो सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत असतो. नुकताच गौरवने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

गौरवने “महापशुधन एक्स्पो 2023 शिर्डीमध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील साहेब यांच्याबरोबरचा एक खास क्षण,” असं कॅप्शन देत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो आणि सुजय विखे ‘माय नेम इज लखन’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

दरम्यान, गौरवने महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून अभिनय क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून गौरवने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गौरव घराघरात पोहोचला. गौरवने ‘संजू’, ‘कामयाब’, ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात देखील काम केलं आहे.