रिल्ससाठी तरुणी विमानतळावरील लगेज बेल्टवर झोपली; व्हिडिओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर एक तरूणी रील बनवताना विमानतळावरील लगेज बेल्टवर झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    सध्या सर्वत्र रिल्स बनवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावर कंटेंट तयार करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. पण रिल्स तयार करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विचित्र वागणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. सोशल मीडियावर एक तरूणी रील बनवताना विमानतळावरील लगेज बेल्टवर झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावर रील बनवण्याचा ‘व्हायरस’ विमानतळावरही पोहोचला आहे, अशा कमेंट नेटकरी करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

    व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरूणी रील बनविण्यासाठी विमानतळावर झोपली आहे. ‘कुछ-कुछ होता है’ या गाण्यावर रील बनवत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती  रील बनवण्यासाठी विमानतळावर असणाऱ्या लगेज बेल्टवर झोपली आहे. आता विमानतळावर सामानाच्या पट्ट्यावर झोपून रील बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रकरणाची सीआयएसएफने दखल घेण्याची मागणी लोकं करत आहेत.

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या विमानतळावरील रिल व्हिडिओवरुन नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. आता रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म, बस आणि रस्त्यावरून आता हा ‘रीलचा व्हायरस’थेट विमानतळावरही पोहोचला आहे. खरं तर आजकाल रील बनविण्याचं वेड लागलेलं दिसतंय. या रील हॅंगओव्हरचे अनेकदा विपरीत परिणाम देखील पाहायला मिळत आहेत.