girl slapped teacher

सध्या सोशल मीडियावर विद्यार्थी आणि शिक्षिकेचा एक व्हिडिओ व्हायरल (Student Slapped Teacher Viral Video) होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी वर्गात प्रचंड गोंधळ घालताना दिसत आहे. कहर म्हणजे या मुलीने शिक्षिकेला जोरदार कानशिलात लगावली(Girl Slapped Teacher) आणि शिवीगाळही केली. या मुलीचा प्रताप इथेच संपत नाही तर या मुलीने शिक्षिकेसमोरच टेबलवर फोन जोरात आपटल्याचेही दिसत आहे.

    सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत असतात. काही मजेशीर असतात तर काही आश्चर्यकारक. सध्या सोशल मीडियावर विद्यार्थी आणि शिक्षिकेचा एक व्हिडिओ व्हायरल(Student Slapped Teacher Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांना धक्काच बसला आहे. कारण सोशल मीडियावर(Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी वर्गात प्रचंड गोंधळ घालताना दिसत आहे. कहर म्हणजे या मुलीने शिक्षिकेला जोरदार कानशिलात लगावली(Girl Slapped Teacher) आणि शिवीगाळही केली. या मुलीचा प्रताप इथेच संपत नाही तर या मुलीने शिक्षिकेसमोरच टेबलवर फोन जोरात आपटल्याचेही दिसत आहे.

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ टेक्सासमधल्या शाळेतला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विद्यार्थिनी रागाच्या भरात तिच्या बेंचवरून तावातावाने उठते आणि तिच्या आईला बोलावण्यासाठी शिक्षिकेच्या डेस्कजवळ येते. त्याचवेळी शिक्षिकेने फोन करण्यास नकार देते. त्यामुळे ती शिक्षिकेसोबत हुज्जत घालते. ती चक्क शिक्षिकेच्या कानशिलातच लगावते. हे पाहून शिक्षिकेने तिला वर्गाबाहेर जाण्यासाठी सांगितलं. पण विद्यार्थिनी शिक्षिकेचं काहीही न ऐकता जागेवरच उभी राहिली आणि टेबलवरील फोनवरून तिच्या आईला वारंवार फोन करताना दिसली.

    यानंतर या विद्यार्थिनीने शिक्षिकेला वांशिकतेवर शिवीगाळ केली. तिने टेबलवर ठेवलेला फोन शिक्षिकेच्या दिशेने जोरात फेकून दिला आणि वर्गाबाहेर निघून गेली. यावेळी विद्यार्थीनीच्या या अनपेक्षित कृत्याने हैराण होत शिक्षिका इकडे तिकडे बघू लागते.