girlfriend wrote a unique love letter to persuade her angry lover you will laugh after reading the letter viral on social media nrvb
Pic : theadulthumour

जानू, मला तुझ्यावर संशय नाही. पण जेव्हा एखाद्या मुलीला तुझ्याशी बोलताना पाहते तेव्हा माझ्या मनातही खूपच कालवाकालव होते. खूप काही घडते. जानू, कोणत्याही मुलीशी बोलू नकोस, हसू नकोस.

    नवी दिल्ली : प्रेयसी (Girlfriend) जेव्हा तिच्या प्रियकरासाठी (Lover Boyfriend) पत्र लिहिते तेव्हा ती तिच्या मनातील सर्व भावना त्यात व्यक्त करत असते. मात्र सोशल मीडियावर (Social Media) सध्या हे प्रेमपत्र व्हायरल (Viral) होत आहे. ते वाचून हसून-हसून तुम्हीही गडगडा लोळण घ्याल. या प्रेमपत्रात (Love letter) तरुणी तिच्या प्रियकराची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. हे प्रेमपत्र हिंदी भाषेत लिहिलेले आहे. मुलीने लिहिलेले हे प्रेमाने भरलेले पत्र वाचून युजर्सही हैराण झाले आहेत.

    मुलीने लिहिले की जानू, मला तुझ्यावर संशय नाही. पण जेव्हा एखाद्या मुलीला तुझ्याशी बोलताना पाहते तेव्हा माझ्या मनातही खूपच कालवाकालव होते. खूप काही घडते. जानू, कोणत्याही मुलीशी बोलू नकोस, हसू नकोस. जानू, मी तुझा गैरसमज करत नाहीये. डार्लिंग, मी तुझ्यावर प्रेम करते, म्हणूनच मी हे सांगत आहे.

    कबूतर समजायचं असेल तर समज. तुला नसेल समजायचं तर नको समजूस तुझी मर्जी आणि तू कोणाच्याही घरी जाण्याचा बिलकूलच प्रयत्न करू नकोस, ती मुलगी असेल किंवा नसेलही. पुढे मुलगी आपल्या प्रियकराची माफी मागताना लिहिते की, मुन्ना, चुकीचं लिहिलं असेल तर कुबतरा मला माफ कर. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. सॉरी मुन्ना जर चुकीचं लिहिलं असेल तर माझ्या कबुतरा, जानू, राजा, फौजी, टमाटर, रसगुल्ला. आय मिस यू.

     

    विशेष म्हणजे हे प्रेमपत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर theadulthumour नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. ज्याला सोशल मीडिया युजर्सही भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. यासोबतच ते यावर आपली मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.