golden icecream

तुम्हाला थोडेसे हटके आईस्क्रीम आवडत असतील तर तुम्हाला ते हैदराबादला (Hyderabad) मिळतील. आश्चर्याची बाब म्हणजे इथे सोन्याचे आईस्क्रीमदेखील (Golden Ice cream In Hyderabad) येथे उपलब्ध आहे. तेही २४ कॅरेट सोन्याचे आईस्क्रीम.

  आईस्क्रीम (Ice cream) आवडत नाही अशा व्यक्ती फार कमी असतील.  आपण कायम वेगवेगळे आईस्क्रीमचे प्रकार खाऊन बघत असतो. तुम्हालाही थोडेसे हटके आईस्क्रीम आवडत असतील तर तुम्हाला ते हैदराबादला (Hyderabad) मिळतील. आश्चर्याची बाब म्हणजे इथे सोन्याचे आईस्क्रीमदेखील (Golden Ice cream In Hyderabad) येथे उपलब्ध आहे. तेही २४ कॅरेट सोन्याचे आईस्क्रीम. अभिनव जेसवानी (Abhinav Jeswani) या फूड ब्लॉगरने या आईस्क्रीमचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल  (Viral Video Of Golden Ice cream)होत आहे. या आईस्क्रीमचे नाव मिनी मिडास (Mini Midas) असे ठेवण्यात आले आहे. हैदराबादमधील ह्युबर अँड हॉली कॅफेमध्ये ते उपलब्ध आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by JUST NAGPUR THINGS (@abhinavjeswani)


  व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हे गोल्ड प्लेटेड आईस्क्रीम बनवताना दिसत आहे. सगळ्यात आधी एक आईस्क्रीम कोन घेतला जातो. त्या कोनमध्ये चॉकलेट नट्स, ड्रायफ्रूट आणि चॉकलेट सिरप टाकतो. त्यानंतर डार्क चॉकलेट आईस्क्रीम टाकतो. त्यानंतर चॉकलेट आईस्क्रीम एका साच्यात टाकून कोनमध्ये भरतो. त्यावर सोन्याचा वर्ख लावतो. तसेच चेरी लावतो आणि खाऊ शकतो अशा चमच्यात जेली बॉल ठेवतो. शेवटी ती डिश सजवून ग्राहकाला देतो. अभिनव जेसवानीने जस्ट नागपूर थिंग्ज नावाच्या त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

  या आईस्क्रीमची किंमत ५०० रुपये आहे. याशिवाय त्यावर अतिरिक्त कर भरावा लागेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे, तर व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत.