Gondwana Times The Anticlockwise Clock

जगभरातील घड्याळे तुम्ही पाहिली असतील. परंतु छत्तीसगडमधील एका गावातील घड्याळ तुम्हाला गोंधळात टाकतात. या गावाच्या प्रथेनुसार येथे घड्याळाचे काटे उलट्या दिशेने फिरतात. एवढेच नव्हे तर येथे रात्री 12 वाजल्यानंतर एक नव्हे तर 11 वाजतात. या गावातील घड्याळ अँटी क्लॉकवाइज चालतात(Gondwana Times The Anticlockwise Clock).

    रायपूर : जगभरातील घड्याळे तुम्ही पाहिली असतील. परंतु छत्तीसगडमधील एका गावातील घड्याळ तुम्हाला गोंधळात टाकतात. या गावाच्या प्रथेनुसार येथे घड्याळाचे काटे उलट्या दिशेने फिरतात. एवढेच नव्हे तर येथे रात्री 12 वाजल्यानंतर एक नव्हे तर 11 वाजतात. या गावातील घड्याळ अँटी क्लॉकवाइज चालतात(Gondwana Times The Anticlockwise Clock).

    या प्रथेच पालन करणारे गोंड आदिवासी समुदायाचे लोक आपलेच घड्याळ योग्यप्रकारे चालत असल्याचे सांगतात. या समुदायाने स्वतःच्या घड्याळाला नावही दिले आहे. यांचे घड्याळ गेंडवाना टाइम म्हणवून घेते. पृथ्वी उजवीकडून डाव्या दिशेने फिरते. याचबरोबर चंद्र असो किंवा सूर्य किंवा तारे सर्व याच दिशेने फिरतात असे या लोकांचे मानणे आहे. याचमुळे या समुदायाच्या लोकांनी घड्याळाची दिशाच बदलली आहे.

    गोंड समुदायाच्या लोकांच्या विवाहाची पद्धतही काहीशी वेगळी आहे. या समुदायात वधूवराच्या सप्तपदी इतर लोकांच्या तुलनेत उलट्या दिशेने पूर्ण हातात. या समुदायाचे लोक काही वृक्षांची पूजा करतात. छत्तीसगडच्या या भागात सुमारे 10,000 लोक राहतात.