Viral News : एक बेघर वृद्ध रस्त्यावर बेशुद्ध पडून होता, पोलिसांनी केली मदत आणि जगासमोर ठेवला आदर्श

आंध्र प्रदेश वाहतूक पोलिसांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. असे घडले की, एक बेघर वृद्ध रस्त्यावर बेशुद्ध पडला होता. मग या पोलिसांनी जे केले ते पाहून लोकांचा माणुसकीवर विश्वास कायम असल्याची प्रचिती आली.

    आपल्याला सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून पोलीस (Police) काम करतात. त्यासाठी ते रात्रंदिवस काम करतात. पण कधी कधी ते असे काम करतात, याचे उदाहरण जगात दिले जाते. आंध्र प्रदेश पोलीस (Andhra Pradesh Police) कर्मचाऱ्यांनी अशीच एक कामगिरी केली आहे. त्याचं झालं असं की, ते ड्युटी करत असताना त्यांना रस्त्यात एक बेघर वृद्ध बेशुद्ध पडलेला दिसला. मग काय, ते लगेच मदतीसाठी तिथे पोहोचले.

    हा व्हिडिओ ट्रॅफिक आंध्र प्रदेश पोलिसांच्या ट्विटर पेजवरही शेअर करण्यात आला आहे. जेव्हा लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी पोलिसांच्या या उदात्त कार्याचे कौतुक केले आणि त्यांनी वास्तविक हिरोचे काम केले असल्याचे सांगितले.

    दोघेही ड्युटीवर होते

    वृत्तानुसार, ही घटना १८ जानेवारी रोजी घडली होती. विजयनगरम वाहतूक शाखेजवळ याई सुरेश कुमार आणि आर सत्यनारायण यांची ड्युटी होती. क्लॉट टॉवर जंक्शनजवळ एक वृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला आणि त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याचे पाहून दोघांनीही तेथे जाऊन त्याला मदत केली.

    येथे पहा व्हिडिओ :

     

    पाणी पाजलं आणि रुग्णालयात पाठवलं

    सर्वप्रथम त्याला ओआरएस टाकून पाणी प्यायला लावले, त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून वृद्धाला रुग्णालयात पाठवले. DGP Gowtham Sawang यांनी पोलिसांच्या या उदात्त कार्याचे कौतुक केले आहे. तर मित्रांनो, पोलिसांच्या या उदात्त कार्यातून आपण सर्व काही शिकू या, वृद्ध आणि निराधारांच्या मदतीसाठी कधीही मागे हटू नका.