प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

खरं तर अमेरिकेतील एका शाळेत शिक्षकांनी वर्गातील सर्व मुलांना त्यांच्या लैंगिक कल्पना काय आहेत याविषयी त्यांच्या लैंगिक कल्पनांवर निबंध लिहायला सांगितला होता आणि मुलांनी यावरही लिहायला सुरुवात केली होती, पण जेव्हा मुले घरी पोचली.

नवी दिल्ली : आजच्या काळात जगभरात अशा अनेक शाळा आहेत, ज्या मुलांना लैंगिक शिक्षणाबाबत (Sex Education) जागरूक करतात. अशा परिस्थितीत, एका शिक्षकाने वर्गाच्या अभ्यासक्रमानुसार मुलांना त्याच्याशी संबंधित असाइनमेंट (Sexual Fantasy Assignment) दिल्याने शाळेत गोंधळ झाला. पालकांना कळलं आणि जे व्हायचं होतं तेच झालं.

‘सेक्सुअल फॅन्टसी’ म्हणजे काय?

खरं तर अमेरिकेतील एका शाळेत शिक्षकांनी वर्गातील सर्व मुलांना त्यांच्या लैंगिक कल्पना काय आहेत याविषयी त्यांच्या लैंगिक कल्पनांवर निबंध लिहायला सांगितला होता आणि मुलांनी यावरही लिहायला सुरुवात केली होती, पण जेव्हा मुले घरी पोचली. घरी जाऊन त्यांच्या पालकांना याबाबत सांगितल्यावर गोंधळ उडाला.

पालकांना आला राग

काही लोकांनी त्याचे फोटो ऑनलाईन देखील शेअर केले आहेत. यामुळे मुलांचे पालक चांगलेच संतापले आहेत. कोणत्याही शिक्षकाला मुलाकडून हे विचारण्याचा अधिकार नसल्याचेही पालकांचे म्हणणे आहे. असाइनमेंट दिल्याबद्दल अनेक पालकांनी शाळेतील शिक्षक आणि शाळा या दोघांवरही टीका केली.

काय म्हणाले शाळा प्रशासन?

मात्र, हे प्रकरण आता शाळा प्रशासनापर्यंत पोहोचले आहे. ज्यावर शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले की ही असाइनमेंट वर्गाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आली आहे आणि यापुढे ती विद्यार्थ्यांच्या ग्रेडचा भाग असणार नाही. सध्या ही बातमी सोशल मीडियावर चर्चेत आहे.