
एवढा मोठा व्हेल समुद्रकिनारी कसा आला, आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचे साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. काही स्थानिक मच्छिमारांच्या ही गोष्टी लक्षात आली.
Viral Video : केरळमधून (Kerala) एक विचित्र घटना समोर आली आहे. कोझिकोडच्या दक्षिण बीचवर लांबलचक व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. व्हेलचे (Whale) शव समुद्रातून वाहून समुद्रकिनारी पोहोचल्याचे म्हटलं जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर व्हेल दिसल्यानंतर तेथे लोकांची मोठी गर्दी झाली होती. एवढा मोठा व्हेल समुद्रकिनारी कसा आला, आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचे साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. काही स्थानिक मच्छिमारांच्या ही गोष्टी लक्षात आली.
शनिवारी सकाळी 10.15 च्या सुमारास मच्छिमारांनी व्हेल मृत अवस्थेत पाहिला. त्यांनी दावा केला की व्हेलचे शव 2 दिवसांपेक्षा जास्त जुने आहे. कारण ते शव सडण्यास सुरुवात झाली होती. मच्छीमारांनी असेही सांगितले की त्याचे शरीर खूपच मोठे होते. ती सुमारे 50 फूट उंच दिसत होता. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी व्हेलचे पोस्टमॉर्टम समुद्रकिनाऱ्यावरच करण्यात येणार होते. शवविच्छेदनानंतर प्रोटोकॉलनुसार त्याला खड्ड्यात पुरण्यात येईल.
हा व्हिडिओ होतोय व्हायरल
View this post on Instagram
समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या व्हेलच्या मृतदेहाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हेलला पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे आणि हा कोठून आला आणि त्याच मृत्यू कशामुळे झाला असा यूजर्सना पडला आहे. व्हेलचे शव समुद्रकिनाऱ्यावर पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर मृतदेहाभोवती अनेक लोक उपस्थित असून त्याचे फोटो काढत आहेत. काही लोक मृतदेहासोबत सेल्फी घेतानाही दिसले
मृतदेहामुळे स्फोट होण्याची भीती
सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘कृपया व्हेलच्या शवाजवळ जाऊ नका. कारण जर त्याच्या शरीरात गॅस असेल तर तो फुटू शकतो, ज्यामुळे जवळ उभे असलेले लोक जखमी होऊ शकतात. मोठ्या व्हेलच्या शरीरात गॅस तयार होतो हे साऱ्यांनाच माहिती आहे, ज्यामुळे मृत शरीराचा स्फोट देखील होऊ शकतो. कधी कधी हे वायू सुरळीतपणे सोडले जातात, तर काही वेळा ते जोरात स्फोटांसह बाहेर पडतानाही दिसले आहेत.