सरनाईकांच्या प्रकरणात किरीट सोमय्यांची थेट मंत्रालयात घुसखोरी? कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल्स बघितल्याने खळबळ!

सरनाईक यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर सोमैय्या यानी मंत्रालयातील नगर विकास खात्यात कक्ष १६ मध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून काही फाईल्स बघितल्या. कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल्स तपासतानाचे किरीट सोमय्या यांचे मंत्रालयातील छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे.

    मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) ताब्यात असलेल्या नगरविकास विभागाच्या मंत्रालयातील कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांच्या आसनांवर बसून भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Shivsena Leader Pratap Sarnaik) यांच्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे तपासल्याने मंत्रालयात खळबळ माजली आहे.

    मंत्रालयातील छायाचित्र व्हायरल

    सरनाईक यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर सोमैय्या यानी मंत्रालयातील नगर विकास खात्यात कक्ष १६ मध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून काही फाईल्स बघितल्या. कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल्स तपासतानाचे किरीट सोमय्या यांचे मंत्रालयातील छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे.

    मंत्रालयात चौकशी सुरू

    किरीट सोमय्या यांनी कोणत्या अधिकारात मंत्रालयात जाऊन अशाप्रकारे फाईल्स बघितल्या आहेत. त्याबाबत वरिष्ठांना कल्पना देण्यात आली होती का? तसेच अधिकार्‍यांनीही कोणत्या अधिकारात या फाईल दाखवल्या याबाबत मंत्रालयात चौकशी सुरू झाली असून ठाण्यातील नगरविकास मंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील राजकीय वादाची किनार या चर्चाना असल्याचे सांगण्यात येत आहे.