गुजरातमधील एका व्यक्तीने छापलीये अशी पत्रिका, ज्यात राहू शकते चिमणी

गुजरातमधील (Gujarat) एका व्यक्तीने अशी लग्नपत्रिका (Wedding Card) छापल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. हे कार्ड इतके आलिशान आहे की, त्यात चिमणी (Sparrow) आरामात राहू शकते.

  लग्नाचा हंगाम सुरू आहे. अशा वेळी घराघरांत लग्नपत्रिका (Wedding Card) जमा होतात, त्या नंतर कचऱ्यात टाकल्या जातात. मात्र, लग्न संस्मरणीय करण्यासाठी महागडे कार्ड छापणारे अनेक जण आहेत. पण गुजरातमधील एका व्यक्तीने अशी लग्नपत्रिका छापली की, हे प्रकरण चर्चेत आले आहे. हे कार्ड इतके आलिशान आहे की त्यात चिमणी आरामात राहू शकते.

  हे कार्ड बनतं चिमणीचं घरटं

  शिवभाई रावजीभाई गोहिल हे गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आपल्या मुलाची लग्नाची निमंत्रण पत्रिका अनोखी आणि संस्मरणीय असावी, असे त्यांनी ठरवले होते. म्हणूनच त्यांनी एक कार्ड बनवले की, ते वापरल्यानंतर, पाहुणे ते कचराकुंडीत फेकण्याऐवजी पक्ष्यांच्या घरात बदलू शकतात. होय, हे कार्ड एक घरटे बनते ज्यामध्ये चिमण्या किंवा इतर लहान पक्षी आरामात राहू शकतात.

  जेणेकरून लोकांनी कार्ड कचर्‍यात टाकू नये

   

  ४५ वर्षीय शिवभाई यांनी सांगितले की, ही अद्भुत कल्पना त्यांचा मुलगा जयेशची होती. खरंतर जयेशला त्याची लग्नपत्रिका अशी हवी होती की ती पुन्हा वापरता येईल. आमंत्रणानंतर लोकांनी कार्ड कचऱ्यात फेकून द्यावे असे त्याला वाटत नव्हते. हे कुटुंब निसर्गप्रेमी आहे. त्यांच्या घरात पक्ष्यांची अनेक घरटी आहेत. ते म्हणतात- आम्ही पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.

  ही लग्नपत्रिका आहे की कायदेशीर नोटीस?

  काही दिवसांपूर्वी या लग्नपत्रिकेचीही खूप चर्चा झाली होती. ते निमंत्रण पत्र किंवा कायदेशीर नोटीस आहे, असे लोक म्हणत होते. वास्तविक, या कार्डची भाषा आणि डिझाइन दोन्ही अतिशय ‘कायदेशीर’ आहेत. त्यावर ‘लग्नाच्या स्वागताची सूचना’ असे लिहिले आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ नुसार त्यांचे लग्न होत आहे. आणि हो, कार्डमध्ये हिंदू विवाह कायदा १९९५ चाही उल्लेख आहे.