अरे काय हे ? एकानं फ्लाय ओव्हरवरुन भिरकावल्या दहाच्या नोटा, नोटा जमा करण्यासाठी ही गर्दी.. लोकं गाड्या थांबवून मागू लागले पैसे

फ्लायओव्हरवर उभं राहून तो दहा-दहाच्या नोटा उडवत होता. या 10 च्या नोटा पकडण्यासाठी फ्लाय ओव्हरच्या खाली काही क्षणात मोठी गर्दी जमा झाली. इतकंच काय तर फ्लाय ओव्हरवरुन जात असलेल्या माणसांनीही गाड्या थांबवल्या.

  बंगळुरु : एका व्यक्तीनं (Man) शहराच्या मध्यवर्ती भागात (City Central Place) असलेल्या फ्लायओव्हरवर उभं राहून (Statnd On Flyover) अजब वर्तन केलं. त्यानं फ्लायओव्हरवर उभं राहून तिथून 10-10 च्या नोटा हवेत भिरकावल्या (Man Thrrow Bank Notes Stand On Flyover). मंगळवारी सकाळी बंगळुरुत (Bengluru) घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ (Video) सध्या चांगलाच व्हायरल (Viral) होतोय.

  या व्हिडीओत ज्या माणसाच्या गळ्यात घड्याळ टांगलेलं आहे, त्यानं हे कृत्य केल्याचं दिसतंय. फ्लायओव्हरवर उभं राहून तो दहा-दहाच्या नोटा उडवत होता. या 10 च्या नोटा पकडण्यासाठी फ्लाय ओव्हरच्या खाली काही क्षणात मोठी गर्दी जमा झाली. इतकंच काय तर फ्लाय ओव्हरवरुन जात असलेल्या माणसांनीही गाड्या थांबवल्या. गाड्या थांबवून ते या व्यक्तीकडे पैशांची मागणी करु लागले. काही जण धावत फ्लाय ओव्हरच्या खाली गेले आणि त्यांनी पैसे जमा करण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्या परिसरात अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं.

  पाहा व्हिडिओ :

  पोलिसांनी पैसे भिरकावणाऱ्याला केली अटक

  या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीनं दाखल झाले. जो व्यक्ती हे पैसे हवेत भिरकावत होता, त्याला पोलिसांनी तातडीनं अटक केली. हा तरुण 30 वर्षांचा होता. त्यानं फ्लाय ओव्हरवरुन 3 हजार रुपयांच्या नोटा भिरकावल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचा संशय आता पोलिसांना आहे.

  मानसिकता आली समोर

  झालेल्या प्रकारानं एकूणच मानवी समाजाची मानसिकता समोर आली आहे. या तरुणानं पैसे भिरकवायला सुरुवात केल्यानंतर, कुणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट पैसे गोळा करुन जास्तीत जास्त पैसे आपल्याला कसे मिळतील, याकडं अनेकांचं लक्ष होतं. फ्लाय ओव्हरवरुन स्वत:च्या गाड्या घेऊन जाणारे हे पाहून चक्क थांबले. त्यांनी या तरुणाकडं पैसे देण्याची भीकच जवळपास मागितली. काही जण तर धावत खाली जाऊन पैसे जमा करण्याची पळापळ करु लागले. समाज काय प्रकारचा विचार करतो, हेच या कृत्यातून दिसून आलं.