बँकेत सुरक्षारक्षकाने लावायला सांगितला Mask आणि भाईने केलं असं काम की तुम्हालाही बसेल धक्का

'मिरर.को.युके' च्या अहवालानुसार, शांघाय येथे होंगमेई रोडवर बँक ऑफ शांघाय (Bank Of Shanghai) मध्ये गेलेल्या एका श्रीमंत व्यक्तीने बँक स्टाफची वागणूक आणि सेवा अतिशय वाईट असल्याचे सांगत तेथून आपली सर्व जमा असलेली रक्कम काढणे आणि नोटा बँक कर्मचाऱ्यांना हाताने मोजण्याची मागणी केली आहे.

  ही अजब घटना चीन (China) मध्ये घडली आहे. बँकेतील सुरक्षा रक्षकाने मास्क (Mask) घालायला सांगितल्यावर एका करोडपतीचा (Millionaire) रागाचा पार कडेलोट झाला, आणि त्याने रागाच्या भरातच बँकेत खात्यावर जमा असलेली आपले सर्व पैसे काढून घेतले आहेत. एवढ्यावरच तो थांबला नाही, या भाईने बँकेतील कर्मचाऱ्यांना सर्व पैसे हाताने मोजण्याची विचित्र शिक्षाही केली आहे. चीनी सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाले आहेत.

  हाताने मोजायला सांगितली संपूर्ण रक्कम

  ‘मिरर.को.युके’ च्या वृत्तानुसार, शांघाय येथे होंगमेई रोडवर बँक ऑफ शांघाय (Bank Of Shanghai) मध्ये गेलेल्या एका श्रीमंत व्यक्तीने बँक स्टाफची वागणूक आणि सेवा अतिशय वाईट असल्याचे सांगत तेथून आपली सर्व जमा असलेली रक्कम काढणे आणि नोटा बँक कर्मचाऱ्यांना हाताने मोजण्याची मागणी केली आहे.

  बँकेतून ५ दशलक्ष युआन रोख काढले

   

  सोशल नेटवर्किंग साइट वीबो (Weibo) वर ही व्यक्ती ‘सनवेअर’ (Sunwear) म्हणून ओळखली जाते. त्याने बँक ऑफ शांघायच्या शाखेतून ५ दशलक्ष युआन (सुमारे ५,८४,७४,३५० रुपये) च्या नोटा काढल्याचा आरोप आहे. तो माणूस म्हणाला की, बँक कर्मचाऱ्यांच्या वाईट वागणुकीमुळे मी सर्व पैसे काढून दुसऱ्या बँकेत टाकले.

  व्हायरल न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  बँकेच्या सिंगल करन्सी अकाऊंटरवरून ही रक्कम काढण्यासाठी दोन बँक कर्मचाऱ्यांना सुमारे २ तास लागले, असे त्या व्यक्तीने सांगितले. ‘सनवेअर’च्या या पोस्टनंतर त्याचे ऑनलाइन फॉलोअर्स १.७ दशलक्ष झाले आहेत. तसेच, बँक कामगार पैसे मोजत आणि ते बॅगमध्ये भरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.