दुबईच्या राजाचा सर्वात महागडा घटस्फोट; पत्नीला पोटगीदाखल द्यावे लागणार ५५०० कोटी, राणीने मागितले होते १४ हजार कोटी

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश फिलिप मूर (Philip Moore) यांनी आपल्या निर्णयात सांगितले की, राजकुमारी हया (Princess Haya) आणि तिच्या मुलांना दहशतवाद किंवा अपहरण (Terrorism Or Kidnapping) यासारख्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी (Security) विशेष व्यवस्था (Special Arrangements) करण्यात यावी. त्यांना ब्रिटनमध्ये विशेष संरक्षणाची गरज आहे.

  • राजकुमारी हयाला सुमारे २५०० कोटी रुपये एकरकमी दिले जाणार आहेत
  • राजाच्या दोन मुलांसाठी २९०० कोटी रुपये बँकेत ठेवण्यात येणार आहेत
  • मुले मोठी झाल्यावर त्यांना दरवर्षी ११२ कोटी रुपये द्यावे लागतील

दुबई : दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकतूम यांनी त्यांची पत्नी राजकुमारी हया हिला घटस्फोट दिला आहे. या बदल्यात त्यांना राजकुमारीला सुमारे ५५०० कोटी रुपये (५५४ दशलक्ष पौंड) द्यावे लागतील. ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने याबाबत किंग यांना आदेश दिले आहेत. घटस्फोटाचा निपटारा आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी राजाला ही रक्कम द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. या वाटाघाटी ब्रिटिश कायदेशीर इतिहासातील सर्वात मोठ्या वाटाघाटींपैकी एक आहे. राजकुमारी हया ही जॉर्डनचे माजी राजे हुसेन यांची मुलगी आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश फिलिप मूर (Philip Moore) यांनी आपल्या निर्णयात सांगितले की, राजकुमारी हया (Princess Haya) आणि तिच्या मुलांना दहशतवाद किंवा अपहरण (Terrorism Or Kidnapping) यासारख्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी (Security) विशेष व्यवस्था (Special Arrangements) करण्यात यावी. त्यांना ब्रिटनमध्ये विशेष संरक्षणाची गरज आहे.

राजकुमारीला तातडीने २५०० कोटी रुपये मिळतील

वकिलांच्या म्हणण्यानुसार, शेख यांनी दिलेल्या रकमेपैकी २,५०० कोटी रुपये (£251.5 दशलक्ष) राजकुमारी हयाला एकरकमी दिले जातील. त्यांच्या दोन्ही मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी २९०० कोटी रुपये (२९० दशलक्ष पौंड) बँकेत सुरक्षितता म्हणून ठेवले जातील. याशिवाय मुले मोठी झाल्यावर दरवर्षी ११२ कोटी रुपये (११.२ दशलक्ष पौंड) द्यावे लागतील. राजकुमारी हयाने या समझोत्यासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपये (१.४ अब्ज पौंड) मागितले होते.

कोण आहे राजकुमारी हया

राजकुमारी हया शेख मोहम्मद यांची सहावी पत्नी आहे. त्यांनी ऑक्सफर्डमधून राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. २००४ मध्ये, तिने दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्याशी लग्न केले. २०१९ मध्ये अचानक दुबई सोडून इंग्लंडला गेली. यानंतर तिने पतीवर अनेक आरोप केले. आपल्या जीवाला धोका असल्याचेही राजकुमारीने स्वतःहून सांगितले होते.

शेख यांची मुलगीही होती चर्चेत

राजकुमारी हयाच्या आधी दुबईच्या राजघराण्याची मुलगी राजकुमारी लतीफाही चर्चेत होती. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तिने दुबईतील महिलांच्या स्थितीबाबत अनेक आरोप केले. याशिवाय तिने वडिलांवरही तिला ओलीस ठेवल्याचा आरोप होता.