Mysterious Gold-Coloured Chariot Washes Ashore In Andhra

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली येथील समुद्रकिनाऱ्याजवळ मंगळवारी संध्याकाळी अचानक रहस्यमयी सोन्याचा रथ बाहेर आला. सुद्रावर तरंगणारा हा रथ पाहून लोक थक्क झाले. हा रथ किनाऱ्याकडे सरकत होता. यानंतर लोकांनी दोरीने बांधून हा रथ किनाऱ्यावर आणला(Mysterious Gold-Coloured Chariot Washes Ashore In Andhra).

    विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली येथील समुद्रकिनाऱ्याजवळ मंगळवारी संध्याकाळी अचानक रहस्यमयी सोन्याचा रथ बाहेर आला. सुद्रावर तरंगणारा हा रथ पाहून लोक थक्क झाले. हा रथ किनाऱ्याकडे सरकत होता. यानंतर लोकांनी दोरीने बांधून हा रथ किनाऱ्यावर आणला(Mysterious Gold-Coloured Chariot Washes Ashore In Andhra).

    हा रथ अगदी सोन्याचा दिसत आहे. मात्र, समुद्रात वाहत असताना हा रथ कुठून आला, हे सध्या कोणालाच कळू शकलेले नसून, आग्नेय आशियाई देशांतील मठातून हा रथ आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रिपोर्टनुसार, चक्रीवादळामुळे हा रथ समुद्रात उडून सुन्नापल्ली किनार्‍याजवळ पोहोचला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आतापर्यंत कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.

    चक्रीवादळाच्या जोरावर निर्माण झालेल्या भरतीच्या लाटांमुळे रथ किनाऱ्यावर पोहोचू लागला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक हा रथ पाहिला आणि त्याला दोरीने बांधून किना-यावर आणले. सोन्याच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने किनाऱ्यावर दाखल झाले.

    हा रथ लोकांच्या कुतूहलाचे कारण बनला आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर प्रथम कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. यामुळे म्यानमार, थायलंड, मलेशिया किंवा इंडोनेशिया यांसारख्या अंदमान समुद्राच्या जवळच्या देशातून लाटांसह हा रथ आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

    रथ मंदिराच्या आकाराच्या असून अतिशय भव्य आणि सोन्याचा मुलामा दिलेला आहे. समुद्रातून रथ बाहेर आल्याचे वृत्त परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये धार्मिक भावनेची लाट उसळली आहे.  मात्र, या रहस्यमय रथाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.