neeraj chopra

नीरज चोप्राने गुरुवारी मुंबईत इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड्स (Indian Sports Hounour Awards 2023) कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्यानंतर एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये नीरज चोप्राने सर्वांसोबत डान्स केला.

भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) भालाफेकीतील कौशल्याचे अनेक चाहते आहेत. मात्र आता त्याच्या डान्सचेही अनेक जण फॅन झाले आहेत. नीरज चोप्राने गुरुवारी मुंबईत इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड्स (Indian Sports Hounour Awards 2023) कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्यानंतर एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये नीरज चोप्राने सर्वांसोबत डान्स केला. नीरजचा (Neeraj Chopra Dance Video) डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा गोल्डन बॉय अगदी देसी स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


विरल भयानीच्या अकाऊंटवरून नीरज चोप्राच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये नीरज चोप्रा हार्डी संधूच्या ‘बिजली-बिजली’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नीरजसोबत कंटेंट क्रिएटर रुही दोसानी, यशराज मुखाटे आणि दीपराज जाधव देखील आहेत. थ्री-पीस सूट परिधान करून पुरस्कार सोहळ्यात पोहोचलेल्या नीरज चोप्राने डान्स करताना कोट काढला आणि तो बेभान होऊन नाचू लागला. यापूर्वी नीरज चोप्राने आपल्या स्टाईलने रेड कार्पेटवर धुमाकूळ घातला होता.

इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड्स 2023 साठी गुरुवारी रात्री मुंबईत अनेक सेलिब्रिटी जमले होते. ज्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा समावेश होता, ज्यांनी दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अंगद बेदी, नेहा धूपिया यांच्यासोबत पोझ दिली होती.

नीरजच्या या व्हिडिओवर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. नीरज चोप्राच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका एका यूजरने लिहिले, “खेळाडू नीरज चोप्राला मजा करताना पाहून आनंद झाला!” तर दुसऱ्याने लिहले की, “हा आहे कुल चॅम्प .” तिसरा युजर म्हणाला, भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी हा एक आहे.” एकाने लिहिलं की,“खूप मेडल मिळवणं अजून बाकी आहे. नीरजच्या डोक्यात ही प्रसिद्धीची हवा शिरायला नको.”