mp driving cycle in labor pain

न्यूझीलंडमधील एका महिला खासदाराने (Female Mp Drives Cycle In Labor Pain)प्रसुतीच्या कळा सुरु असताना सायकल चालवत दवाखाना(Cycling With Labor Pain) गाठला. त्यानंतर बाळाला सुखरूप जन्मही दिला.

    न्यूझीलंडमध्ये(NewZealand) एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडमधील एका महिला खासदाराने (Female Mp Drives Cycle In Labor Pain)प्रसुतीच्या कळा सुरु असताना सायकल चालवत दवाखाना(Cycling With Labor Pain) गाठला. त्यानंतर बाळाला सुखरूप जन्मही दिला. दवाखान्यात पोहोचल्यानंतर एक तासानंतर त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. आपण पाहतो की, प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानंतर महिलांना काहीच सुचत नाही, त्यांना ॲम्बुलन्सच्या मदतीने दवाखान्यात घेऊन जावे लागते. न्यूझीलंडमधील खासदार ज्युली एनी जेंटर मात्र याला अपवाद आहेत.

    महत्त्वाची बाब म्हणजे या महिला खासदाराने हे पहिल्यांदाच केले नसून याअगोदरदेखील २०१८ मध्ये ज्युलीने पहिल्या डिलिव्हरीच्या वेळीदेखील दवाखान्यामध्ये जाण्यासाठी सायकलचा वापर केला होता. ज्युली यांनी डिलिव्हरीनंतरचे बाळासोबतचे काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी दवाखान्यातील सर्व स्टाफचे आभार देखील मानले आहेत.

    ज्युली या अमेरिका आणि न्यूझीलंड अशा दोन्ही देशांच्या नागरिक असून त्यांचा जन्म अमेरिकेमध्ये झाला आहे. त्या २००६ पासून न्यूझीलंडमध्ये स्थायिक आहेत.

    ज्युली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, मोठी बातमी….आज सकाळी ३ वाजता आम्ही आमच्या कुटुंबातील नव्या सदस्याचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे ज्युली यांनी या पोस्टमध्ये म्हटंले आहे की, प्रसुतीच्या कळा सहन करत सायकलवर दवाखान्यात जायचे याबद्दल आम्ही कुठलाही प्लॅन केलेला नव्हता, पण ते अचानक घडले.