
जगभरातील वैज्ञानिक वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. आता वैज्ञानिकांनी यासंबंधी एक प्रयोग केला आहे जो हैराण करणारा आहे. वैज्ञानिकांनी एका वृद्ध उंदराला तरुण केले आहे(Older rats made young; Researcher's tremendous research).
दिल्ली : जगभरातील वैज्ञानिक वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. आता वैज्ञानिकांनी यासंबंधी एक प्रयोग केला आहे जो हैराण करणारा आहे. वैज्ञानिकांनी एका वृद्ध उंदराला तरुण केले आहे(Older rats made young; Researcher’s tremendous research).
यासाठी त्यांनी तरुण उंदराची विष्ठा वृद्ध उंदरात ट्रान्सप्लांट केली या रिसर्च दरम्यान तरुण उंदरातून वृद्ध उंदरांमध्ये फीकल मायक्रोब्सला ट्रान्सप्लांट करण्यात आले. ज्याने वृद्ध उंदराच्या आतड्या, डोळे आणि मेंदू तरुण उंदरांसारखा काम करू लागला. ब्रिटिश वैज्ञानिकांनी वृद्ध उंदरांना तरुण बनवण्यासाठी विष्ठेचा वापर केला. हे जरा विचित्र वाटणारे आहे. पण सत्य आहे.
वैज्ञानिकांनी जेव्हा उंदरांवर हा प्रयोग केला, तेव्हा त्यांच्या तरुण उंदरांसारखी लक्षणे दिसू लागली. वैज्ञानिकांनी जेव्हा वृद्ध उंदरांमध्ये तरुण उंदरांची विष्ठा ट्रान्सप्लांट केली तेव्हा वृद्ध उंदरांच्या शरीरात फायदेशीर मायक्रोब्स म्हणाजे रोगाणू पोहोचले.