
हा व्यक्ती खायला अनेक चविष्ट पदार्थ मागवतो. ज्यामध्ये ती व्यक्ती पिझ्झा आणि मॉकटेल ऑर्डर करते. जेवण झाल्यावर तो बिलाची मागणी करतो. त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी येऊन बिल देतात. त्यानंतर जे घडले ते...
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलबद्दल (Taj Hotel) तुम्ही ऐकलेच असेल. जे पाहण्यासाठी लांबून लोक येतात. इथल्या चहा-कॉफीपासून (Tea-Coffee) खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही खूप महाग (Expensive) आणि स्वादिष्ट (Tasty) आहे. पण प्रत्येकाला इथे जेवण परवडत नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्ही ताज हॉटेलच्या बाहेर एक व्यक्ती उभी असल्याचे पाहू शकता. त्याला खूप भूक लागली आहे. त्यानंतर हॉटेलमध्ये जाण्यासाठी तो आधी जॅकेट घालतो, त्यानंतर हातात नाणी घेऊन ताज हॉटेलमध्ये जातो. आत गेल्यावर तो जेवणाची ऑर्डर देतो.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्यक्ती खायला अनेक चविष्ट पदार्थ मागवतो. ज्यामध्ये ती व्यक्ती पिझ्झा आणि मॉकटेल ऑर्डर करते. जेवण झाल्यावर तो बिलाची मागणी करतो. त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी येऊन बिल देतात. त्यानंतर जे घडले ते पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले कारण त्याने हॉटेलमध्ये कॅश म्हणून चिल्लरने बिल भरले.
View this post on Instagram
आजूबाजूचे लोक त्याच्याकडे बारकाईने पाहत होते. तो कर्मचाऱ्यांना नाणी देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो तरुण असेही म्हणतो की, तुम्ही जसे आहात तसेच राहा, आलिशान ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही छोट्या ठिकाणाहून आला आहात असे अजिबातच समजू नका.