अगदी मजेत माकड चालवतंय गोल्फ कार्ट ! व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्याही मजेशीर प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माकड आरामात कार चालवताना दिसत आहे. तुम्ही अनेक लोकांना वेगवेगळ्या कार, कार इत्यादी चालवताना पाहिले असेल. पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला गाडी चालवताना पाहिलं आहे का?

    असे म्हणतात की, मानवाचे (Monkey) पूर्वज माकडे होते. माकडांनाही मानवाच्या अनेक क्रिया माहीत असतात. असेच काहीसे एका माकडाने दाखवले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माकड आरामात कार (Monkey Driving Car) चालवताना दिसत आहे. तुम्ही अनेक लोकांना वेगवेगळ्या कार, कार इत्यादी चालवताना पाहिले असेल. पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला गाडी चालवताना पाहिलं आहे का? प्राणी वाहन चालवत असल्याचा व्हिडिओ (viral video) समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या लोकांची मने जिंकत असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    काही प्राणी इतके हुशार असतात की ते माणसाने केलेली अवघड कामे सहज करू शकतात.आता ऑरंगुटान पहा, माणसाप्रमाणेच गोल्फ कार्ट चालवत आहे. व्हिडिओमध्ये ओरंगुटान अतिशय आरामात कार चालवत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ओरंगुटान गोल्फ कार्ट चालवताना दिसत आहे. त्याचे ड्रायव्हिंगचे कौशल्य पाहून तो प्राणी आहे असे कोणीही म्हणणार नाही. गोल्फ कार्ट चालवण्याच्या ऑरंगुटानच्या कौशल्याने प्रत्येकजण प्रभावित झाला आहे. नेटकरीही या व्हिडिओवर मजेशीर कंमेट करत आहेत. हा व्हिडिओ दुबईचा आहे.

    संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची मुलगी शेखा फातिमा रशीद अल मकतूम हिच्याकडे दुबईत प्राणीसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयात इतर प्राण्यांसोबत ओरंगुटानही ठेवण्यात आले आहे. या व्हिडिओतील ओरंगुटानचे नाव रॅम्बो आहे. रॅम्बो गोल्फ कार्टसह विविध लहान वाहने चालवण्यात पटाईत आहे. रॅम्बो लहानपणापासून वेगवेगळी वाहने चालवत आहे. रॅम्बोचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रॅम्बो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

    सर्वजण रॅम्बोचे कौतुक करत आहेत.@TansuYegen नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.1. 59 मिनिटांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

    व्हिडिओ पहा