तेलात तुपात नाही तर चक्क डिझेल वापरुन करतायेत पराठा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एका अनोख्या पराठ्याची चर्चा रंगली आहे. हा पराठा म्हणजे डिझेल पराठा. तेलामध्ये किंवा तुपामध्ये नाही तर चक्क डिझेलमध्ये हा पराठा तयार केला जात आहे.

    भारतीय पदार्थांमध्ये पराठा हा अत्यंत लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. बटाट्यापासून तयार होणारा पराठा अनेकांचा आवडता आहे. पराठ्यामध्ये आता बटाट्यासह अनेक विविध प्रकारचे पराठे बाजारामध्ये उपलब्ध आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या पराठ्याची चर्चा रंगली आहे. हा पराठा म्हणजे डिझेल पराठा. तेलामध्ये किंवा तुपामध्ये नाही तर चक्क डिझेलमध्ये हा पराठा तयार केला जात आहे.

    सोशल मीडियावर अनेक फुड ब्लॉगिंगचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. विविध हटके डिश नेटकऱ्यांसोबत शेअर करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पण सध्या एक विचित्र पदार्थ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क डिझेल वापरुन पराठा बनवला जात आहे. हे पाहून नेटकरी देखील अवाक झाले आहे. घरी तेलाचा किंवा तुपाचा वापर करुन पराठा तुम्ही नक्कीच खाल्ला असेल पण डिझेलमध्ये तयार होणार पराठा पहिल्यांदाच समोर आल्यामुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

    व्हायरल होणारा हा डिझेल पराठ्याचा व्हिडिओ चंदीगड मधील असल्याचा दावा केला जात आहे. ढाबा मालक स्वतः व्हिडिओमध्ये या पराठ्याबद्दल माहिती देत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि डिझेल पराठा व्हायरल जरी होत असला तरी नेटकऱ्यांना हा प्रकार अजिबात आवडलेला नाही. अशा पद्धतीच्या खाण्यामुळे कॅन्सरला आमंत्रण देत असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.