old woman viral video

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी जल्लोष व गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. मात्र या सगळ्यात एका ७० वर्षीय आजीबाईंचा व्हिडिओ (Video Viral) खूप व्हायरल झाला आहे.

    राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही मतदान पार पडलं. त्यानंतर मंगळवारी २० डिसेंबरला या ग्रामपंचायत निवडणुकांचे (Grampanchayat Election 2022) निकाल समोर आले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी जल्लोष व गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. मात्र या सगळ्यात एका ७० वर्षीय आजीबाईंचा व्हिडिओ (Video Viral) खूप व्हायरल झाला आहे.


    परभणीच्या (Parbhani ) पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे महाविकास आघाडीने ९ पैकी ७ जागा जिंकून आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यापैकी एका जागेवर या आजीबाईंच्या सूपूर्तने विजयी पताका रोवली होती. याचाच आनंद व्यक्त करताना आजीबाईंनी अशा भन्नाट डान्स केला की ज्याची चर्चा अद्यापही सुरु आहे.चेतन बोडके या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण या आजीबाईंनी तुफान ऊर्जा पाहू शकता.

    या आजीबाईंचं नाव रुक्मिणीबाई ढोणे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या पॅनलमध्ये ९ पैकी ७ जागांवर विजय मिळालेल्याने गळ्यात हार घालून ढोल ताशाच्या तालावर त्या धमाल डान्स करत आहेत.

    थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल समोर आल्यावर महाविकासआघाडी व भाजपा आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून आपणच सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३२५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. तर, भाजपाच्या दाव्यानुसार, भाजप आणि शिंदे गटाने मिळून ३,२०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.